tipeharish.blogspot.com

Saturday, November 26, 2022

पर्यटन विकासावर परिणाम करणारे घटक

पर्यटन विकासावर परिणाम करणारे घटक 

पर्यटन हा एक प्रमुख आर्थिक व्यवसाय असून यामुळे मोठ्या प्रमणावर परकीय चलन प्राप्त होते याशिवाय रोजगाराच्या संधी प्राप्त होऊन प्रादेशिक विकासास मदत होते. असे असले तरी पर्यटनाचा सर्वत्र सारखा विकास झालेला नाही कारण त्यावर  खालील   घटकांचा प्रभाव पडतो.
१. प्राकृतिक घटक 
२. सामाजिक व सांस्कृतिक घटक 
३. आर्थिक घटक 
 
1. प्राकृतिक किंवा भौगोलिक घटक :
भूपृष्ठ रचना / भूरुपे: उत्तुंग पर्वतरांगा, हिरवाईने नटलेले डोंगर, पाना-फुलांनी बहरलेल्या दऱ्या, घळ्या, नद्यांची बहारदार पात्रे, हिमनद्यांचे मनमोहक भुआकार, विस्तृत मैदाने, अथांग महासागर, वाळूचे रुपेरी मैदाने, मरुस्थळी पर्यटकांचे देहभान हरपून टाकतात. 
पर्वत व डोंगररांगा : पूर्वीच्या काळी परंपरागत शेती व चराऊ कुरणांसाठी डोंगररांगाचा वापर केला जात असे.
पर्यटन क्षेत्राचा विकास होवू लागल्यापासून विकसीत देशात पर्यटक मोठ्या संख्येने या पर्वतरांगातील हिरवाईने नटलेल्या भागात आपला वेळ व्यतीत करू लागले आहेत. हिमाच्छादित उत्तुंग पर्वतरांगाचे आकर्षण साहसप्रेमी पर्यटकांमध्ये वाढू लागले आहे. पानाफुलांनी बहरलेली झाडे, इंद्रधनुषी,सूर्यकिरणे, सूर्यास्त मनमोहक असतात. स्वच्छ व प्रदुषणमुक्त हवेमुळे आरोग्यधामांची निर्मिती केली जाते. डेहराडून, सिमला, दार्जिलिंग, मसुरी, उटी, महाबळेश्वर अशा असंख्य डोंगररांगांनी वेढलेल्या हिरवाईने नटलेल्या स्थळांवर पर्यटक गर्दी करतात.

ज्वालामुखी: भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात निर्माण झालेला लाव्हारस एखाद्या भेगेतून किंवा छिद्रातून बाहेर येण्याच्या
क्रियेस ज्वालामुखी असे म्हणतात. या उद्रेकातून लाव्हारसाबरोबर अंतर्गत भागातून खडकांचे तुकडे, राख, धुलीकण, चिखल, विषारी वायू भूपृष्ठावर फेकले जातात. व काही कालावधीनंतर थंड होतात. लाव्हारसापासून विविध भूआकारांची निर्मिती होते. मृत ज्वालामुखीच्या मुखापाशी पावसाचे पाणी साठून क्रेटर लेक्सची निर्मिती होते. हा निसर्गाचा रौद्र अवतार असला तरी त्याचे सौंदर्यही पर्यटकांना आकर्षित करत असते. जपानमधील फुजियामा, भूमध्य सागरातील व्हॅल-कॅनो, पिलीयन स्ट्रॅम्बोली


दऱ्या, घळई : पानाफुलांनी, हिमाच्छादीत डोंगररांगाच्या पायथ्याला हिरवाईचा शालू पांघरलेल्या खोल दऱ्या पर्यटकांना साद घालत असतात. दऱ्या खोऱ्याचे सौंदर्यही अवर्णनीय असते. विविध वृक्षांनी नटलेल्या दऱ्या वन्य प्राणी पक्षांचे आश्रयस्थान असतात. मुक्तपणाने वावरणाऱ्या जंगलाच्या आश्रयाने राहणाऱ्या या प्राण्यांचा मुक्त वावर पाहण्यासाठी पर्यटक या भागात जातात. जबलपूर येथील नर्मदा नदीने तयार केलेली संगमरवरी दरी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. अमेरिकेतील कोलोरॅडो घळई , हिमाचल प्रदेशातील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, केरळमधील सायलेंट व्हॅली

प्रवाळ द्विपे: समुद्रात राहणाऱ्या प्रवाळ किटकांच्या अवशिष्ठ भागापासून प्रवाळ खडकांची निर्मिती होते. प्रवाळ किटक हे अतिशय सूक्ष्म स्फटिकासारखे व रंगीबेरंगी असतात. त्यांचे सांगाडे एकत्र येवून या प्रवाळ खडकाची निर्मिती होते. पर्यटक पाण्याखाली जावून या प्रवाळ खडकांचे सौंदर्य अनुभवत असतात. आज पृथ्वीवरील सर्व प्रवाळ दिपे त्यांच्या विलक्षण सौंदर्याने पर्यटकांना मोहित करत आहेत. ही बेटे आज पर्यटन केंद्रे म्हणून विकसीत झाली आहेत. ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य भागात क्वीन्सलॅन्डच्या किनाऱ्याने पसरलेली 'ग्रेट बॅरिअर रिफ' ही जगातील सर्वात मोठी प्रवाळ मालिका १९२० कि.मी. लांबीची आहे. भारतातील आदमान निकोबार बेटाजवळील संयुक्त संस्थानाच्या पूर्व किनान्यावरील फ्लोरीण रिफ ही ठिकाणे पर्यटकांची आकर्षणे बनू लागली आहेत.

हवामान: स्वच्छ व अल्हाददायक हवामान असलेल्या भागात पर्यटक नेहमी गर्दी करतात. सर्वत्र हवामान सारखे आढळत नाही. काही ठिकाणी हवामान उष्ण व दमट असते तर काही ठिकाणी उष्ण व कोरडे असते. स्वच्छ आरोग्यवर्धक हवामान असलेल्या प्रदेशात पर्यटनाचा विकास होतो. विषुववृत्तीय प्रदेशापेक्षा समशितोष्ण कटिबंधातील पर्यटन स्थळे स्वच्छ हवामानामुळे विकसित होतात. पर्वतीय प्रदेशात आरोग्यधामांची निर्मिती होते. उदा. डलहौसी, कुलू-मनाली, सिमला, कोडाई कॅनॉल, उटी इ. ठिकाणची आरोग्यधामे प्रसिद्ध आहेत. भूमध्य सागरी, पश्चिम युरोपीय व मौसमी हवामानाच्या प्रदेशात पर्यटन व्यवसाय विकसित होतो. स्वच्छ व सुर्यप्रकाशयुक्त हवेमध्ये सूर्य स्नानासाठी (Sun Bath) पर्यटकांची गर्दी असते. अनुकूल हवेमुळे पर्यटन व्यवसाय विकसीत होण्यास मदत होते.

पर्जन्य : रिमझिम पावसात मनसोक्त फिरण्याची मजा तरुण पर्यटकांना मात्र साद घालत असते. उष्ण कटिबंधातील
पर्जन्य हंगामी असते. समशितोष्ण कटिबंधात पर्जन्य वर्षभर रिमझिम स्वरुपाचा असतो. पाण्याचा मुबलक पुरवठा होतो. पाणी टंचाई जाणवत नाही. त्यामुळे इथे पर्यटन विकसित होते. माथेरान, पंचमढी, महाबळेश्वर येथे पावसाळ्यात तरुणाई स्वच्छंदे बागडताना दिसते. पर्जन्यामुळे काही भागात धबधबे, झरे निर्माण होतात, तलाव भरतात. त्यामुळे अशा ठिकाणी पर्यटक याचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी करतात. 



हिम: पृथ्वीवरील उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुवीय भागात अतिशीत हवामान आढळते. ही क्षेत्रे नेहमी बर्फाच्छादित
असतात. अतिशय थंड हवामारामुळे वर्षातील बहुतेक दिवस येथे बर्फवृष्टी होत असते. उन्हाळ्यात काही पर्यटक या ठिकाणी पर्यटनास येतात. अतिशय थंड हवामानामुळे या भागात पर्यटकांची संख्या कमी आढळते. हिमवृष्टीचा अनोखा अविष्कार पाहण्यासाठी पर्यटक उंच पर्वतीय प्रदेशात गर्दी करतात. हिवाळ्यात पर्वतीय प्रदेशात चालणारे हिवाळी खेळ पर्यटकांचे आकर्षण आहेत. उदा. जन्मू काश्मिरमधील गुलमर्ग, सोनमर्ग, हिमाचल प्रदेशात  - उलहौसी, सिमला, कुलू-मनाली हिवाळी स्पर्धांचे आयोजन केले जाते. काही वेळेला हिमवृष्टीमुळे वाहतुकीच्या सुविधा विस्कळीत होतात. विमान वाहतूक व रस्ते वाहतूक बंद होते. हवामानाचे इतर आविष्कारही पर्यटकांना साद घालतात. दाट धुक्यातून वाट काढत फिरण्याचा आनंद पर्यटक घेत असतात. दव, धुके, राईम, गारा निसर्गाच्या सौंदर्यात भर घालत असतात.

वन्य प्राणीजीवन:  प्राण्याचे निवासस्थान म्हणजे डोंगराळ भागात असणारी घनदाट जंगले होय. मानवाच्या अवाजवी हस्तक्षेपामुळे पृथ्वीवरील प्राण्यांचे हे वस्ती स्थानांचे क्षेत्र कमी होवू लागले आहे. जंगलामध्ये वन्य पशु पक्षांना मुक्तपणे आपले जीवन जगता येते. पशुपक्षांचा हा मुक्त संचार जवळून अनुभवण्यासाठी पर्यटक जंगलयुक्त प्रदेशात जात असतात.. या पशु-पक्षांचे विहंगम दर्शन मानवी मनाला आनंद देते. 

अभयारण्ये: पशुपक्षांसाठी तयार करण्यात आलेल्या संरक्षित क्षेत्रास अभयारण्य म्हणतात. मानवाच्या अति
वावरामुळे प्राण्यांच्या मुक्तपणे फिरण्यावर काही प्रमाणावर बंधने आली. देश विदेशचे हजारो पर्यटक या अभयारण्यांना भेटी देतात. भारतातही सुमारे २४० अभयारण्ये अस्तित्वात आहेत. विशिष्ट प्राण्यासाठी ही अभयारण्ये प्रसिद्ध आहेत. उदा. आसाम – काझीरंगा, गुजरातमधील सौराष्ट्र  - गीर, आंध्र प्रदेशातील -  नागार्जुनसागर महाराष्ट्रात चंद्रपूर – ताडोबा, म. प्रदेशातील - कान्हा, उत्तरांचलमधील - जिम कार्बेट नॅशनल पार्क तमिळनाडू - मदूमलाई, महाराष्ट्रातही अशी अभयारण्ये निर्माण केली आहेत. उदा. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्य भंडारा जिल्ह्यातील 'नागझिरा अभयारण्य' व नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान

मृगया क्षेत्रे : शिकार हा मानवाचा प्राचीन व्यवसाय आहे. पूर्वी अन्नासाठी शिकार केली जात असे. प्राचीनकाळी राजे, महाराजे, मंत्री, सरदार यांच्या शिकारीच्या छंदासाठी मुघयाक्षेत्र निर्माण केली जात असत. सागरी भागातही मासेमारीसाठी पर्यटकांची गर्दी असते. आज शिकार बंदी असल्याने व त्यांच्या अवयवाची विक्री करणे पर्यटनास मर्यादित स्वरूप प्राप्त झालेले आहे.

जंगले: पर्यटन व पर्यावरण या दोन्हीसाठी जंगलाची आवश्यकता असते. उच्च पर्वतीय जास्त पावसाच्या ठिकाणी वनस्पतींच्या आश्रयाने राहणाऱ्या पशूपक्षांचे निरीक्षण केले जाते. भारतात सिमला, उटी, दार्जिलिंग केठिकाणी जंगलामध्ये पर्यटनाचा विकास झालेला आहे. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगररांगात असलेले आंबा, फोंडा ही ठिकाणे सांगली, सातारा,कोल्हापूरच्या पर्यटकासाठी पर्वणीच ठरलेली आहेत.

गवताळ कुरणे :-खंडातर्गत कमी पाऊस असणाऱ्या प्रदेशात गवताळ कुरणे पसरलेली असतात. या कुरणांना जगभरात विविध नावानी ओळखले जाते. आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय गवळात प्रदेशास सॅव्हाना म्हणून ओळखले जाते. समशितोष्ण कटिबंधात यांना स्टेपी (रशिया), प्रेअरी (उत्तर अमेरिका), व्हेल्ड (आफ्रिका) नावाने ओळखले जाते. पावसाळ्यात ही कुरणे हिरवेगार तर हिवाळ्यात ती पिवळी पडतात. पावसाळ्यातील व हिवाळ्यातील हे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात

मरूस्थळी :-वाळवंटी प्रदेशात हिरवाईने नटलेला प्रदेश म्हणजे मरूस्थळ होय. मरूस्थळानाच ओयासिस असेम्हटले जाते. येथे पाण्याची थोडीफार उपलब्धता असल्याने खजूराची व इतर झाडी आढळतात. सहारा व अरबस्थानच्या वाळवंटात अशी मरूस्थळी पाहावयास मिळतात.



जलविभाग: निसर्गाच्या सौंदर्यात पाण्याचे विविध अविष्कार सौंदर्यवृद्धी करत असतात. नदी, सरोवरे, हिमनद्या, उष्णोदकाचे फवारे, धबधबे, समुद्र अशा विविध अविष्कारांतून पर्यटक आनंदाची अनुभूती घेत असतो. जगातील अनेक संस्कृत्या नदीकाठावर विकसित झाल्या आहेत. उदा. भारतीय संस्कृती  - सिंधू नदीच्या काठावर, इजिप्शियन संस्कृती  - नाईलच्या काठावर

नदया : पूर मैदान तसेच बारमाही पाण्यामुळे शेतीचा विकास होतो. शेतीवर आधारित उद्योगधंद्याचा विकास होतो. नदीने आपल्या प्रवाह मार्गात निर्माण केलेले भूआकारही तितकेच सौंदर्यपूर्ण असतात. नद्यांच्या काठावर अनेक स्थळे निर्माण होतात. नदी ही आपणासाठी पवित्र असल्याने तिच्या काठावर अनेक धार्मिक स्थळे विकसित झाली आहेत. उदा. गंगेच्या पवित्र काठावर - अलाहाबाद, वाराणसी, हरिद्वार, ऋषीकेश यमुनेच्या काठावर - मथुरा, वृंदावन, गोदावरी - नाशिक, नांदेड, भीमा - पंढरपूर, कृष्णा - औदुंबर, नृसिंहवाडी अशी शेकडो पर्यटनस्थळे विकसित झाली आहेत. नदी आपल्या प्रवाहमार्गात निर्माण करत असलेली कुंडल कासार सरोवर, त्रिभूज प्रदेश प्रेक्षणीय असतात. नदयांनी आपल्या पात्रात निर्माण केलेल्या घळ्या अतिशय सौंदर्यपूर्ण असतात. उदा. जबलपूर जवळ नर्मदेने भेडाघाट येथे तयार केलेली संगमरवरी घळई, तसेच काही नदी प्रदेश घनदाट जंगलांनी युक्त असतात. उदा. दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीचे खोरे, आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे

सरोवरे : सरोवरे म्हणजे भूपृष्ठावरील खोलगट भागातील जलसंचय होय. सरोवरांची निर्मिती खडकात असलेल्या
खोल भागात पाण्याचे संचयन होवून होते. यांचे अस्तित्व पाण्याच्या पातळीवर अवलंबून असते. काही सरोवरे गोड्या पाण्याचे तर काही खारट पाण्याचे असतात. निसर्ग सौंदर्याबरोबर नौकानयनाचा आनंद पर्यटकांना घेता येतो. भारतात लोणार (महाराष्ट्र) चिल्का (ओरिसा), सांबर ( राजस्थान) ही खाऱ्या पाण्याची सरोवरे आहेत. दाल, वूलर (जन्मू काश्मिर), कोलेरू (आंध्र), नैनीताल, दक्षिण तिबेट मधील मानस सरोवर ही गोड्या पाण्याची सरोवरे सृष्टीसौंदर्याच्या दृष्टीने यांना विशेष महत्व आहे. निसर्ग सौंदर्यांनी बहरलेल्या शांत सरोवरांचे प्रदेश आरोग्यधाम विश्रांतीस्थाने म्हणून प्रसिद्ध आहेत. उदा. भारतातील उटी, महाबळेश्वर, तोरणमाळ येथील सरोवरे, मध्य आफ्रिकेतील व्हिक्टोरिया सरोवर, संयुक्त संस्थाने व कॅनडाच्या सीमेवरील ग्रेट लेक्स इ. 

जलप्रपात : निसर्गाचे सौंदर्य वाढवणारा एक अविष्कार म्हणजे जलप्रपात होय. खळाळत खडकांवरून खाली झेपावणारा पाण्याचा प्रचंड प्रवाह आपणाला उल्हासित करत असतो. या प्रचंड पाण्याच्या प्रवाहाच्या खाली खडकांवर पडत असताना होणारा आवाज, खाली झेपावताना उडणारे पाण्याचे तुषार, या प्रचंड जलौंधावर पडणारे सप्तरंगी इंद्रधनुष्य आजूबाजूच्या परिसरात असणारा हिरवाईने नटलेला निसर्ग यांचे तरुण पर्यटकांना जास्त आकर्षण असते. जगात अनेक नद्यांच्या पात्रात धबधब्याची निर्मिती झाली आहे. धबधब्यांची ही ठिकाणे आज पर्यटन स्थळे म्हणून विकसित झाली आहेत. 

बेटे: सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेल्या भूखंडभूमीस बेटे म्हणतात. चारही बाजूंनी अथांग निळा महासागर, रुपेरी वाळूचे किनारी मैदान, वैशिष्ट्यपूर्ण आदिवासी जीवनसंस्कृती, अप्रतिम निसर्ग सौंदयनि बहरलेली. क्षेत्रे यामुळे पर्यटन विकास होत आहे. भारताच्या जवळील अंदमान निकोबार, लक्षद्विप बेटे. हिंदी महासागरातील मॉरिशस बेटे. पॅसिफिक महासागरातील हवाई बेटे तेथील अप्रतिम सौंदयनि पर्यटकांची आवडीची ठिकाणे आहेत.


समुद्रकिनारे : सागरी बेटांप्रमाणे निसर्गसौंदर्याची उधळण करणारे समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करतात. अथांग महासागर किनाऱ्यावर खळाळत येणाऱ्या लाटा, भरती-ओहोटी किनाऱ्यावरील वाळूची मैदाने, नारळ-पोफळीच्या बागा, लाल मातीची मैदाने डोंगर उतारावर असणारी भाताची शेती यांचे सौंदर्य सागरी किनाऱ्याचे सौंदर्य वाढवत असते. या सौंदर्यात सुर्योदय व सूर्यास्त भर घालत असतात. समुद्रकिनारे आहेत अशा भागात पर्यटकांची गर्दी पहावयास मिळते. उदा. गोवा, मुंबई इ.


2. सामाजिक घटक  व सांस्कृतिक घटक : 

पर्यटनामध्ये भौगोलिक घटकांबरोबरच सामाजिक घटकांसाठी महत्त्वाचे स्थान आहे. रॉबिन्सन यांनी 'पर्यटन भूगोल' या प्रभात सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक घटकांना विशेष महत्व दिले आहे. मानवी वस्त्या, प्रार्थना स्थळे, ऐतिहासिक अवशेष, स्मारके यांचे पर्यटकांना आकर्षण असते.

धर्म:- धर्म व धार्मिक स्थळांना पर्यटनामध्ये विशेष महत्त्व आहे. प्राचीन काळात पर्यटन हे धार्मिक कारणासाठी केले जात असे. तीर्थक्षेत्र. नद्याची उगमस्थाने, मंदिरे, चर्च, गुरुद्वारे, दर्गे व मस्जित, साधुसंतांच्या समाध्या यांना मोठ्या प्रमाणवर पर्यटक भेटी देतात.  हरिद्वार, वाराणसी, अलाहाबाद, मधुरा, वृंदावन, तिरुपती, मदुराई, सारनाथ, कन्याकुमारी, पंढरपूर, तुळजापूर, शिर्डी-नाशिक. हिंदू धर्मियांची पवित्र धार्मिक स्थळे आहेत. तेथे पर्यटकांची गर्दी असते. इस्लाम धर्मियांची मक्का, मदिना, ख्रिश्चनांचे व्हॅटीकन सिटी, ज्यु लोकांचे जेरूसलेम येथेही पर्यटक येत असतात. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी यात्रा व उत्सवानिमित्त लाखो भाविक पर्यटन स्थळांना भेटी देतात. उदा. पंढरपूर, पाली, जोतिबा, तुळजापूर, शिर्डी, अक्कलकोट इ.

क्रीडा :- जगामध्ये विविध ठिकाणी सातत्याने खेळांचे आयोजन केले जाते. उदा. फुटबॉल स्पर्धा, ऑलिंपिक स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा इ. अशा विविध स्पर्धामुळे पर्यटक त्याठिकाणी जमा होतात व खेळाचा आनंद लुटतात. त्यामुळे तेथे पर्यटन व्यवसायाला चालना मिळते.अलीकडील काळात भारतामध्ये अनेक प्रकारचे साहसी खेळ खेळले जातात. उदा. हिवाळी स्किडंग, स्कूबा ड्रायव्हिंग, पैराग्लाइडिंग, ट्रेकिंग, गिर्यारोहण, वॉटर राफ्टिंग इ. उत्तर भारतामध्ये गंगा, सिंधू, सतलज, चिनाब या नद्यांमध्ये रिव्हर राफटिंग हा साहसी खेळ पर्यटकांना अनुभवता येतो. पश्चिम घाट व हिमालयीन पर्वत रांगांमध्ये पॅराग्लाइडिंग या साहसी खेळाचे आयोजन केले जाते. समुद्री किनारी भागात सेलिंग, वॉटर स्कीइंग, विंड सर्फिंग अशा खेळाचे आयोजन केले जाते.

चालीरिती, परंपरा व उत्सव :- प्रत्येक समाजाच्या चालीरिती, रूढी-परंपरा वेगवेगळ्या असतात. पर्यटकांना अशा भिन्न-भिन्न परंपरांचे आकर्षण असते. समाजाच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, सण, उत्सव अनुभवण्यासाठी दूरदूरवरून पर्यटक येत असतात.भारत हा विविधतेने नटलेला देश असून येथे अनेक सण व उत्सव साजरे केले जातात. प्रत्येक प्रदेशाचा विशेष असा सण व उत्सवसाजरा केला जातो. उदा. संक्रांत (महाराष्ट्र), पतंग महोत्सव (गुजरात), पोंगल (आंध्र प्रदेश, तामिळनाडू), नवरात्री, जन्माष्टमी, दसरा दिपावली, रामनवमी (संपूर्ण भारत), ओनम (केरळ), रथयात्रा (ओडिशा) इ. भारतातील अशा उत्सवामध्ये देश-विदेशातील पर्यटक सहभागी होत असतात

नृत्य व संगीत :- मानवी समाजात व त्यांच्या परंपरा, चालिरीती, रूढी-परंपरा यामध्ये विविधता पहावयास मिळते. या विविधतेचे प्रतिबिंब त्यांच्या नृत्य व संगीतात पहावयास मिळते. भारताला नृत्य व संगीताची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. विविध प्रदेशाचे नृत्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. उदा. भरतनाट्यम् (कनार्टक), कुचीपुडी (आंध्र प्रदेश), कचकली (केरळ), ओडिसी (ओडिसा) इ.  या नृत्यातून मानवी भावना व्यक्त केल्या जातात. जीवनातील आनंदी क्षणी व नवीन ऋतूच्या आगमनावेळी नृत्ये सादर केली जातात. उदा. भांगडा (पंजाब), बांबूनृत्य ( मिझोराम), गरबा, दांडिया (गुजरात), लेझीम, लावणी (महाराष्ट्र) इ.भारतीय शास्त्रीय संगीत फार प्राचीन काळापासून प्रसिध्द आहे. ढोलक, बासरी, संतूर, पखवाज, सरोद, शहनाई इ. वाद्ये आपल्या प्राचीन संगीताची उज्ज्वल परंपरा व्यक्त करतात. 

हस्तकला :-लहान-मोठे हस्त उद्योग पर्यटकांना आकर्षित करतात. उदा. कश्मिरच्या शाली, गालीचे, म्हैसूरच्या रेशमी साड्या , चंदनाच्या वस्तू , औरंगाबादची पैठणी इ. हस्तउद्योगांमुळे तेथील पर्यटनाचा विकास झाला आहे.

आहार :-  जगामध्ये आहारामध्ये भिन्नता पहावयास मिळते.  काही पर्यटन केंद्रेही तेथे मिळणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण आहारामुळे प्रसिध्द आहेत. उदा. सिंगापूर, हाँगकाँग चायनीज पदार्थ, कोकणातील-भात, मासे, दिल्ली-पेढा, म्हैसूर म्हेसूरपाक, दक्षिण भारत-तांदळाचे विविध पदार्थ, महाराष्ट्र पुरण पोळी इ.

ऐतिहासिक  घटक: यामध्ये युद्धभूमी, स्मारके, किल्ले व ऐतिहासिक वास्तू याचा सामावेश होतो. सुरुवातीच्या काळी सत्ता विस्तारासाठी सतत युद्धे होत असत अशी ठिकाणे युद्धभूमीची ठिकाणे म्हणून ओळखली जातात. उदा. पानिपत, प्लासी, हल्दिघाट इ.  स्मारके: श्रीरंगपट्टणम, रायगड, वढू बुद्रुक,   किल्ले: रायगड, आग्रा, चितोड, मेवाड, जयपूर, सिंधुदुर्ग, जिंजीरा. ऐतिहासिक वास्तू: म्हैसूर- म्हैसूर पॅलेस , विजापूर- गोलघुमट , हैदराबाद- चारमिनार, आग्रा- ताजमहाल  ,पुणे – शनिवार वाडा 

3. आर्थिक घटक :

वाहतूक : पर्यटन विकासामध्ये सुगमतेला महत्त्वाचे स्थान असते. प्रदेशांचा आर्थिक विकास होण्याचे प्रमुख कारण म्हणजे रस्ते, रेल्वे, हवाई व सागरी मार्गांच्या विकासाबरोबरच दळणवळण साधनांमध्ये झालेला आमूलाग्र बदल होय. यामुळे पर्यटन विकास मोठ्या प्रमाणात होत असतो. पर्वतीय व पठारी प्रदेशांपेक्षा मैदानी प्रदेशात सुलभ दळणवळण मार्गांचा व साधनांचा विकास झालेला असतो. त्यामुळे मैदानी प्रदेशात धार्मिक व सांस्कृतिक पर्यटन केंद्रांचा उदय व विकास झालेला आहे. उदा., मुंबई, पुणे, कोल्हापूर, नांदेड, पंढरपूर, अलाहाबाद इत्यादी. याउलट ज्या प्रदेशात वाहतुकीचा विकास झालेला नाही अशा ठिकाणी पर्यटनाचा विकास होत नाही. याच कारणामुळे नैसर्गिक सृष्टिसौंदर्याबरोबर अनेक घटकांची उधळण करणाऱ्या ईशान्य भारतातील राज्यांचा पर्यटन क्षेत्रात विकास झाला नाही. वाहतुकीची साधने सोईची असतील तर पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटन स्थळी गर्दी करतात. 

उद्योग : पर्यटन विकासात उद्योगधंदे हा आर्थिक घटक महत्त्वाचा आहे. पर्यटक कोणताही उद्योगधंदा न करण्याच्या हेतूने आलेला असतो, परंतु काही पर्यटकांना विविध उद्योगधंद्यांविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झालेली असते. याच जिज्ञासेपोटी जी औद्योगिक नगरे आहेत त्या नगरांना पर्यटक भेटी देतात. उदा., बर्कले, लंडन, शिकागो, गॅरी, मँचेस्टर, टोकिओ, बीजिंग, केपटाउन, मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता इत्यादी उद्योगधंद्यांच्या संदर्भातील त्या ठिकाणचे असलेले वैशिष्ट्यपूर्ण कौशल्य व तंत्रज्ञान यांचे अवलोकन करून निरीक्षणाद्वारे स्वदेशातील उद्योगधंद्यांच्या विकासात त्याचा वापर करणे पर्यटकांच्या हिताचे असते. याशिवाय पर्यटन स्थळी विविध हस्तोद्योग व कुटीरोद्योग यांना मोठ्या प्रमाणात चालना मिळते. उदा., काश्मीरमधील शाली व गालिचे, पैठणी, जोधपुरी, पितांबरी इत्यादी स्थानिक मालास उठाव निर्माण होतो. याशिवाय महाबळेश्वरमधील विविध फळांचे ज्यूस, चॉकलेट्स, लाकडी नक्षीदार काठ्या, सावंतवाडीतील लाकडी खेळणी पर्यटकांना आकर्षित करून घेत असतात. तसेच विविध समुद्रकिनाऱ्यावरील मोती. शंखांच्या माळा त्याचबरोबर इतर ठिकाणची मद्यनिर्मिती, विविध प्रकारच्या नवनवीन गोष्टी पर्यटकांना गर्दी करण्यास कारणीभूत असतात. विविध औद्योगिक नगरे ही पर्यटनाला पोषक ठरतात

हॉटेल आणि निवास व्यवस्था : पर्यटन स्थळी असलेली निवासस्थाने, (हॉटेल, धर्मशाळा, लॉजेस) हीदेखील पर्यटकांची आकर्षणे असतात. ज्या ठिकाणी निवास व्यवस्था व जेवणाची उत्तम सोय असते व जेथे पर्यटकांना सर्व प्रकारच्या सेवा चांगल्या, स्वस्त व तत्पर मिळतात अशा ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने आकर्षिले जातात. तेथे पर्यटनाचा विकास होतो. उदा., गणपतीपुळे, पावस, सावंतवाडी इत्यादी. याउलट ज्या ठिकाणी निवासाचा अभाव असतो तेथे पर्यटनाचा विकास होत नाही.

CSS Website Layout

STUDY MATERIAL

 स्थलांतर : 

जन्मदर व मृत्युदराप्रमाणेच स्थलांतर हा घटक कोणत्याही प्रदेशातील लोकसंख्येतबदल घडवून आणणारा एक महत्वाचा घटक आहे. स्थलांतरामुळे लोकसंख्येच्या संरचनेत तसेच लिंग,भाषा, शिक्षण, व्यवसाय यामध्येही बदल होतो. त्याचप्रमाणे स्थलांतरामुळे सांस्कृतिक अदलाबदलही होते. 

व्याख्या

  • मानव किंवा मानवी समूह एका भागातून दुसऱ्या भागात जातो या क्रियेला स्थलांतर असे म्हणतात
  • एखाद्या व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाचे एका भौगोलिक प्रदेशाकडून दुसऱ्या भौगोलिक प्रदेशाकडे तात्पुरते किंवा कायमस्वरूपी जाणे या क्रियेस स्थलांतर असे म्हणतात.
  • एका भौगोलिक किंवा राजकीय विभागातून दुसऱ्या भौगोलिक किंवा राजकीय विभागात दीर्घकाळ किंवा अल्पकाळ वास्तव्य करण्याच्या हेतूने जाणाऱ्या व्यक्तींच्या किंवा मानवी गटाच्या हालचालीस किंवा क्रियेस स्थलांतर असे म्हणतात
  •  एका विशिष्ट कालावधीत एका भौगोलिक ठिकाणापासून दुसऱ्या भौगोलिक प्रदेशात राहावयास जाणे यास स्थलांतर असे म्हणतात.
स्थलांतराचे प्रकार :
प्रदेशानुसार, कालावधीनुसार, उद्देशानुसार आणि स्थानानुसार वेगवेगळे प्रकार पडतात.

A) प्रदेशानुसार स्थलांतर
प्रदेशानुसार अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतर 
१. अंतर्गत स्थलांतर : जेव्हा व्यक्ती किंवा व्यक्तीचा समूह देशाच्या सिमेअंतर्गत एका भागातून दुसऱ्या भगात जातात त्यास अंतर्गत स्थलांतर म्हणतात. उदा. मुबई वरून दिल्ली 
    अंतरराज्यीय स्थलांतर : जेव्हा एखाद्या देशातील एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होणाऱ्या स्थलांतरास                     अंतरराज्यीय स्थलांतर' असे म्हणतात. उदा., सोलापूर जिल्ह्यातून लातूर जिल्ह्यात होणारे स्थलांतर
    राज्यांतर्गत स्थलांतर : जेव्हा एखाद्या राज्याच्या सीमेअंतर्गत होणाऱ्या स्थलांतरास किंवा एका जिल्ह्यातून                दुसऱ्या  जिल्ह्यात होणाऱ्या स्थलांतरास 'राज्यांतर्गत स्थलांतर' असे म्हणतात. उदा. सोलापूर जिल्ह्यातून लातूर          जिल्ह्यात होणारे स्थलांतर
२. आंतरराष्ट्रीय स्थलांतर : एखाद्या राष्ट्राच्या सीमा ओलांडून दुसऱ्या राष्ट्राच्या सीमेत जाणे यास आंतरराष्ट्रीय स्थलांतर असे म्हणतात. उदा., भारतातून श्रीलंका देशात होणारे स्थलांतर आंतरराष्ट्रीय स्थलांतराचा लोकसंख्यावाढ, वितरण व संरचना यावर मोठा परिणाम होतो. सर्वसाधारणपणे जगात अविकसित देशांतून विकसित देशात आंतरराष्ट्रीय स्थलांतर मोठ्या प्रमाणात होते.

B) कालावधीनुसार स्थलांतर : कालावधीनुसार स्थलांतराचे अल्पकालीन व दीर्घकालीन स्थलांतर असे प्रकार पडतात.
१. अल्पकालीन स्थलांतर : आपल्या कायमस्वरूपी निवासापासून काही काळासाठी स्थलांतर केले जाते त्यास अल्पकालीन स्थलांतर असे म्हणतात. यास तात्पुरते स्थलांतर असेही म्हणतात. उदा., सोलापूरमधून मुंबई  येथे नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने होणारे स्थलांतर
२. हंगामी स्थलांतर : ऋतूनुसार किंवा हंगामानुसार होणाऱ्या स्थलांतरास हंगामी स्थलांतर असे म्हणतात. उदा., मराठवाड्यातून ऊसतोड कामगार हे पश्चिम महाराष्ट्रात ऊस  तोडणी हंगामात.
३.दीर्घकालीन स्थलांतर : या स्थलांतरात आपले राहते ठिकाण सोडून दीर्घकाळासाठी नवीन ठिकाणी स्थलांतर केले जाते.
४.कायमस्वरूपी स्थलांतर :एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्यास जाणे म्हणजे कायमचे स्थलांतर' होय. उदा., चांगली नोकरीची संधी, उच्च राहणीमान, आल्हाददायक हवामान इत्यादी कारणांमुळे स्थलांतरित व्यक्ती आकर्षित होते व कायमस्वरूपी स्थलांतर करण्याचा निर्णय घेते. 

C) उद्देशानुसार स्थलांतराचे प्रकार : सांस्कृतिक, राजकीय व आर्थिक स्थलांतर असे मुख्य तीन प्रकार पडतात.
१. सांस्कृतिक स्थलांतर: सांस्कृतिक स्थलांतर हे एखादा धर्म, जात किंवा पंथाचे तसेच विशिष्ट संस्कृतीचे लोक आपला धर्म व संस्कृतीच्या प्रसारासाठी व संरक्षणासाठी स्थलांतर करतात त्यास सांस्कृतिक स्थलांतर असे म्हणतात. उदा., प्रेषित पैगंबरांनी इस्लाम धर्माच्या प्रसारासाठी व संरक्षणासाठी अनुयायांसह मक्केहून मदिनेला केलेले स्थलांतर शिक्षणासाठी केलेली स्थलांतरे ही सांस्कृतिक स्थलांतरे आहेत. भारतातून ऑक्सफर्ड,केंब्रिज विद्यापीठात झालेली स्थलांतरे या प्रकारची आहेत
२. राजकीय स्थलांतर: राजकीय स्थलांतरे ही शक्यतो सक्तीने व अनिच्छेने होतात. युद्धे, देशाची फाळणी, देशाचे विभाजन, एकीकरण, सीमा, सरहद्द, याप्रसंगी होणारे स्थलांतर राजकीय स्वरूपाचे असतात. उदा., दोन्ही महायुद्धाच्या वेळी झालेली स्थलांतरे ही राजकीय स्थलांतरे होती. उदा., ज्यू लोकांनी जर्मनीतून इस्रायलकडे केलेले स्थलांतर, भारत व पाकिस्तानमध्ये झालेली फाळणी, उत्तर व दक्षिण कोरियामध्ये झालेले युद्ध
३.आर्थिक स्थलांतर: मानवाचे जीवन हे आर्थिक घटकांवर अवलंबून असते. नोकरी, रोजगार, व्यापार व्यवसायानिमित्त जी स्थलांतरे केली जातात त्यास आर्थिक स्थलांतर असे म्हणतात. उदा., पोर्तुगीज, फ्रेंच, डच, स्पॅनिश, ब्रिटिश या युरोपियनांनी आशिया, आफ्रिका व अमेरिका खंडात केलेली स्थलांतरे ही आर्थिक स्थलांतरे होती. आर्थिक स्थलांतर हे ऐच्छिक असते. त्यामध्ये कोणतीही सक्ती नसते. आधुनिक काळातील बहुतेक स्थलांतरे ही या प्रकारात मोडतात.

D) स्थानानुसार स्थलांतराचे प्रकार : ग्रामीण- ग्रामीण , ग्रामीण – नागरी, नागरी – नागरी,  व नागरी - ग्रामीण स्थलांतर असे प्रकार पडतात.
१. ग्रामीण- ग्रामीण स्थलांतर : एका गावाकडून दुसन्या गावाकडे होणारे स्थलांतर म्हणजे 'ग्रामीण ग्रामीण स्थलांतर' होय. एका लहान खेड्यातून मोठ्या खेड्याकडे रोजगार, व्यवसायाच्या निमित्ताने हे स्थलांतर केले जाते. विशेषतः शेतीसमृद्ध असलेल्या गावाकडे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होते. 
२. ग्रामीण - नागरी स्थलांतर : ग्रामीण भागाकडून नागरी भागाकडे होणाऱ्या स्थलांतरास 'ग्रामीण-नागरी स्थलांतर' असे म्हणतात, नागरी भागातील आकर्षित करणाऱ्या सेवासुविधा, उच्च राहणीमान, शिक्षण, मनोरंजन, आरोग्य, करमणुकीची साधने या घटकांमुळे खेड्यातील लोक नागरी भागाकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात. स्थलांतरामध्ये तरुणवर्गाचे स्थलांतर शहरी भागामध्ये प्रमाणात होते. उदा., कोकण, मराठवाडा, विदर्भ या विभागातील खेड्यातून रोजगार व इतर कारणाने पुणे, मुंबई या औद्योगिक पट्ट्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतर 
३. नागरी - नागरी स्थलांतर: एका शहराकडून - दुसऱ्या होणाऱ्या स्थलांतरास नागरी नागरी स्थलांतर असे म्हणतात. रोजगाराच्या उत्तम संधी, वाहतूक वळणवळण, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन इत्यादी कारणांमुळे नागरी नागरी स्थलांतराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. उदा., सोलापूर शहरातून पुणे, मुंबई या शहराकडे होणारे स्थलांतर 
४. नागरी - ग्रामीण स्थलांतर : नागरी भागाकडूनग्रामीण भागाकडे होणाऱ्या स्थलांतरास नागरी ग्रामीण स्थलांतर असे म्हणतात नागरी भागातील दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या विविध समस्या, लोकसंख्येची वाढ, प्रदूषण, जागेची टंचाई, वाहतुकीची कोंडी, बेकारी, असुरक्षितता, स्वच्छ हवामान, मुबलक पाणीपुरवठा इत्यादींमुळे नागरी भागातून लोक आपल्या गावाकडे येतात. शासकीय सवलतीमुळे अनेक ग्रामीण भागात राष्ट्रीय स्तरावरील उद्योग सुरू झाल्याने नागरी भागातील लोक स्थलांतर करतात. ग्रामीण भागात दूध प्रकल्प, साखर उद्योग, कागदनिर्मिती, शैक्षणिक केंद्र, सूतगिरण्या इत्यादी ठिकाणी डॉक्टर, शिक्षण, तंत्रज्ञान, व्यवस्थापक मंडळ तसेच कौशल्यपूर्ण कामगारांना संधी मिळत असल्याने ग्रामीण भागात स्थलांतर होत आहे. उदा., मुंबई-पुणे शहरातून ग्रामीण भागाकडे होणारे स्थलांतर.

स्थलांतराची कारणे: 
नैसर्गिक घटक :
१. भूकंप व ज्वालामुखी : वारंवार भूकंप व ज्वालामुखी घडून येतात. अशा प्रदेशातील लोक सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करतात. उदा., 1993 मध्ये महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात झालेल्या भूकंपाच्या वेळी अनेक लोकांनी सुरक्षित ठिकाणी इतरत्र स्थलांतर केले. तसेच कैलिफोर्निया, जपान, इंडोनेशिया, न्यू गिनी येथे भूकंप व ज्वालामुखीच्या क्षेत्रातून अनेक लोकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलेले आढळते.
२. भूमिपात : पर्वतीय प्रदेशात अनेकदा भूमिपात पडून जनजीवन विस्कळीत होते. त्यामुळे भूमिपात होणाऱ्या ठिकाणापासून सुरक्षित ठिकाणी लोक स्थलांतर करतात. उदा. भूतान, नेपाळ व भारत इत्यादी 
३.महापूर व दुष्काळ : अतिपर्जन्य व बर्फ वितळल्यामुळे नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी मिळून नद्यांना पूर येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सभोवतालच्या प्रदेशात पाणी पसरून प्राणहानी व वित्तहानी होते. ज्या नद्यांना वारंवार पूर येतात अशा नद्यालगतचे लोक पूररेषेच्या पलीकडे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करतात. उदा., कोसी व ब्रह्मपुत्रा नदी (भारत), हो-यँग-हो नदी (चीन) अशा नदीच्या पूरग्रस्त प्रदेशातील अनेक लोक इतरत्र स्थलांतरित झाले आहेत.वारंवार दुष्काळ व अवर्षण पडणाऱ्या प्रदेशात शेतीवर विपरीत परिणाम होतो. यामुळे शेतीक्षेत्राशी संबंधित असलेले शेतकरी, मजूर बेकार होतात. अशा दुष्काळग्रस्त भागातील लोक जेथे अन्न, पाणी, रोजगार मिळेल अशा भागात स्थलांतर करतात. उदा. महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यातील माण, खटाव, जत, सांगोला
४. चक्रीवादळे:  चक्रीवादळामुळे समुद्र किनारपट्रीलगतच्या प्रदेशात प्राणहानी वितहानी होते. ज्या भागात अशा वादळांचा वारंवार धोका पोहोचतो. तेथील लोकांनी स्थलांतर केलेले आढळते. उदा., 1969 मध्ये आंध्र प्रदेशाच्या पूर्व भागात हजारो लोक मृत्युमुखी पडले, तर हजारो लोक सुरक्षित ठिकाणी कायमचे स्थलांतर केले.

आर्थिक घटक 
१. सुपीक मृदा: ज्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात मृदा ही सुपीक आढळते. अशा प्रदेशात शेतीचा विकास मोठ्या प्रमाणावर होतो. येथे उद्योग, व्यापार, वाहतूक दळणवळण सुविधांचा विकास होतो. अशा प्रदेशात मानवी जीवनाला सुखदायी व आरोग्यप्रद संधी प्राप्त होत असल्यामुळे, अशा प्रदेशात अनेक लोक स्थलांतरित होतात, उदा., भारतातील उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, 
२. उद्योगधंदे : जगातील औद्योगिकदृष्ट्या विकसित प्रदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असल्याने रोजगाराच्या निमित्ताने लोक आकर्षित होतात. अशा औद्योगिक प्रदेशात अनेक उद्योगधंद्यांचा विकास होऊन कुशल व अकुशल मजुरांना रोजगार उपलब्ध होतो. ज्या प्रदेशात औद्योगिकीकरण झालेले नाही, अशा प्रदेशातून लोक रोजगाराच्या निमित्ताने औद्योगिक प्रदेशात स्थलांतरित होतात. उदा., दूर- काईन, ओसाका पुणे- मुंबई इत्यादी. - कोबे - टोकिओ - यावाता, मॉस्को तुला गोरकी, भारतातील
३. वाहतूक व दळणवळण सुविधा : ज्या प्रदेशात वाहतुकीच्या विविध मार्गांचा व दळणवळणाचा विकास झाला आहे. अशा प्रदेशात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतात. रोजगार, व्यापार व नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. कारण या प्रदेशात वाहतूक व दळणवळणाच्या सुविधांमुळे लोक स्थलांतरित होतात.
४. खनिजे : तेथे खाणकाम व उद्योगधंद्याचा विकास होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्याचबरोबर नगरांची निर्मिती होऊन व्यापार व इतर विविध व्यवसायांचा विकास होतो. उदा., छोटा नागपूर पठारावरील खनिजे व ऊर्जासाधनांच्या उपलब्धतेमुळे जमशेदपूर, झारिया, बोकारो, राणीगंज, तसेच दिग्बोई (आसाम), अंकलेश्वर, कलोल (गुजरात), कालगुर्ली व कुलगाड़ (ऑस्ट्रेलिया), जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) ही शहरे खनिजसंपत्तीमुळे निर्माण झालेली आहेत.
५.विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रसार व विकास : ज्या प्रदेशात विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार झालेला आहे. अशा प्रदेशात लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उच्च आढळतो. राष्ट्रीय उत्पन्नाबरोबरच दरडोई उत्पन्नात वाढ होत असल्यामुळे अशा सुखसंपन्न औद्योगिक प्रदेशात मानवाच्या विकासाच्या अनेक संधी व पर्याय निर्माण होतात.

सामाजिक व सांस्कृतिक घटक : 
सामाजिक व सांस्कृतिक घटकांचाही स्थलांतरावर परिणाम होतो. सामाजिक रूढी, परंपरा, चालीरीती, एकत्र कुटुंब पद्धती, विवाह पद्धती, जातिव्यवस्था, धार्मिक स्वातंत्र्य, सांस्कृतिक समानता, वांशिक दंगली, सामाजिक बहिष्कार या घटकांचा सामाजिक व सांस्कृतिक घटकांमध्ये समावेश होतो. उदा., भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी हजारो मुस्लीम भारतातून पाकिस्तानात गेले व हजारो हिंदू पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झाले. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अनेक बौद्ध प्रसारक इतर देशांत स्थलांतरित झाले. 18 व्या शतकात ख्रिश्चन धर्माचे धर्मप्रसारक जगातील अनेक देशात स्थलांतरित झाले. जर्मनीतील नाझीवादामुळे ज्यू लोकांनी इतरत्र केलेली स्थलांतरे ही महत्त्वाची आहेत. जगभरातील अनेक देशातील लोक केंब्रिज, ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी स्थलांतरित होत आहेत. तसेच भारतात नालंदा, तक्षशिला यांसारख्या शैक्षणिक ठिकाणी जगभरातील लोक स्थलांतरित झाले होते. आरोग्याच्या सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी अनेक लोक स्थलांतरित होतात
राजकीय घटक :
राजकीय घटकात फाळणी, आणीबाणी, राजकीय अशांतता, तह, करार इत्यादी घटकांचा समावेश होतो. उदा., भारत व पाकिस्तान, उत्तर कोरिया दक्षिण कोरिया, इस्रायल पॅलेस्टाईन इत्यादी देशांत वारंवार राजकीय स्थित्यंतरे घडून येत असल्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते. तसेच 19 व्या शतकात युरोपातील राजकीय अशांततेमुळे अनेक लोक इतर देशांमध्ये स्थलांतरित झाले होते.

स्थलांतराचे परिणाम:  
  • स्थलांतरितांमुळे स्वस्त व मुबलक प्रमाणात मजूर उपलब्ध होऊन उद्योगधंद्यांचा विकास होतो.
  • स्थलांतरितांमुळे लोकसंख्येत वाढ होऊन स्थानिक उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होते.
  • नागरीकरणाचा वेग वाढतो. 
  • साधनसंपत्तीचा विकास होतो.
  • अनेक जाती, धर्म, पंथ, वंश, भाषा इत्यादींचे लोक एकत्र येऊन सामाजिकसलोखा व राष्ट्रीय ऐक्य निर्माण होते.
  • आचारविचारांची देवाण-घेवाण होऊन सामाजिक अभिसरण घडून येते. 
  • आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होतात.
  • वाढत्या लोकसंख्येमुळे लोकसंख्या व साधनसंपत्ती यामध्ये असमतोल निर्माण होतो.
  • लोकसंख्येतील जन्मदर, मृत्युदर, नैसर्गिक वाढ, साक्षरता प्रमाण, लिंग, वयोगट इत्यादींमध्ये परिवर्तने घडून येतात.
  • स्थलांतरित व्यक्ती नवीन प्रदेशात आल्यामुळे त्यांना समायोजनासाठी काही काळ लागतो. या काळात विविध समस्या निर्माण होतात.
  • समाज, धर्म, जात, पंथ, विचारप्रणाली यातील भेदामुळे दोन समूहात सामाजिक संघर्ष निर्माण होतात. याचे रूपांतर अराजकता, धर्मयुद्ध, सामाजिक तणाव निर्माण होतो.
  • स्थलातरांमुळे भाषिक वाद निर्माण होतो
  • सामाजिक स्वास्थ्य व मानसिक आरोग्य बिघडते.
  • मूळ निवासीक्षेत्र व स्थलांतर केलेले क्षेत्र यांच्यातील प्रादेशिक विकासात मोठी दरी निर्माण होते. 
  • स्थलांतरितांमुळे जागेची टंचाई निर्माण होऊन गलिच्छ वस्त्या व झोपडपट्ट्यांची निर्मिती होते. 
  • स्थलांतरितांमुळे लोकसंख्या वाढून अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण होतात.
  • वाहतूक व दळणवळण , शिक्षण, आरोग्य या सेवासुविधांवर ताण पडतो.

दुसऱ्या महायुद्धानंतर झालेली जगातील प्रमुख आंतरराष्ट्रीय स्थलांतरे 
जगात दुसरे महायुद्ध इ.स. 1939 ते 1945 मध्ये घडून आले. या महायुद्धात जर्मनी, जपान, इटली व मित्र राष्ट्र सहभागी होती. दुसऱ्या महायुद्धाची सर्वांत जास्त झळ युरोपियन राष्ट्रांना बसली. या काळात अनेक युरोपीय लोक बेघर झाले. 
युरोपियन लोकांची आंतरराष्ट्रीय स्थलांतरे:  
    दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपचा नकाशा बदलून सीमाही बदलल्या. पोलंड, झेकोस्लाव्हिया व जर्मनी या तीन राष्ट्रांतील लोकांनी मोठ्या प्रमाणात इतर देशांतस्थलांतर केले. सन 1950 पर्यंत पश्चिम जर्मनीत आलेल्या निर्वासितांची संख्या 9 दशलक्ष इतकी होती, तर पूर्व जर्मनीतून 3.5 दशलक्ष व इतरत्र विविध देशांमध्ये स्थलांतरित झाल्यामुळे लोकसंख्येत घट झाली. 1948 पर्यंत रशियातून व इतर देशांतून पोलंडमध्ये 3.5 दशलक्ष ज्यू लोक स्थलांतरित झाले. झेकोस्लाव्हियातून हंगेरीत 100000 तसेच हंगेरी व बल्गेरियातून निर्वासित झालेल्या सुमारे तीन लाख लोकांचे तुर्कस्तानात पुनर्वसन करण्यात आले. 10,00000 लोकांचे प्रामुख्याने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा व इंग्लंडमध्ये व काही लॅटिन अमेरिकन देशामध्ये पुनर्वसन करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धानंतर दरवर्षी सरासरी 6 लाख लोकांनी युरोपबाहेर इतरत्र स्थलांतर केले. मुख्यतः इंग्लंड, इटली, जर्मनी, नेदरलँड, स्पेन व पोर्तुगाल या देशांमधून मोठ्या प्रमाणात युरोपबाहेर स्थलांतर झाले. अर्थात, त्यामुळे या सर्व देशांच्या लोकसंख्येत घट होणे अपेक्षित होते. मात्र असे घडले नाही कारण युरोपमध्ये इतर देशांमधून व युरोप शिवायही इतर खंडातून स्थलांतरित येत होते.दुसऱ्या महायुद्धानंतर उत्तर अमेरिकेत युरोपमधून 2.4 दशलक्ष स्थलांतरित लोक आले व दरवर्षी एक लाखाहून अधिक लोक दक्षिण अमेरिकन खंडातील देशातही स्थलांतरित येत होते. उत्तर अमेरिकेत आलेले 85 टक्के लोक हे युरोपियन देशांतून होते. ऑस्ट्रेलियाकडेही मोठ्या प्रमाणात (सुमारे 7 लाख) लोकांनी कायमच्या वास्तव्यासाठी स्थलांतर केले. 
आशियायी लोकांची स्थलांतरे:  
    आशियायी लोकांचे आंतरराष्ट्रीय स्थलांतरहे फारच मर्यादित स्वरूपात झालेले आहे. इ.स. 1955 ते 1962 या काळात सुमारे 1.5 लाख लोक भारत व पाकिस्तानातून इंग्लंडमध्ये आले. आशियातील काही देशांमधून डॉक्टर्स, इंजिनिअर्स, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ अशा उच्च शिक्षण घेतलेल्या लोकांनी युरोप व अमेरिकेमध्ये केलेले स्थलांतर महत्त्वाचे आहे.आशिया खंडातून सर्वांत मोठे स्थलांतर हे हिंदुस्थानच्या फाळणीनंतर झालेले दिसून येते. भारत व पाकिस्तानमधील लोकांनी एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात सुमारे 15 दशलक्ष लोकांनी स्थलांतर केले. विशेषतः पंजाब, पश्चिम बंगाल, काश्मीर या राज्याचे विभाजन होऊन हिंदू व मुस्लीम बांधव स्थलांतरित झाले. इ.स. 1951 ते 1956 या कालावधीत भारतात 1.5 दशलक्ष हिंदू तर इ.स. 1951 ते 1961 या काळात पाकिस्तानातून भारतात 1.32 दशलक्ष हिंदू स्थलांतरित झाले. 1947 मध्ये पॅलेस्टाईनची फाळणी झाल्यानंतर अरब निर्वासित स्थलांतर करून इस्रायलच्या सीमेबाहेर जॉर्डन, सिरिया, लेबनॉन येथे स्थलांतरित झाले. हाँगकाँगच्या 1961 च्या जनगणनेत असे दिसून आले की तेथील सुमारे 50 टक्के लोकसंख्या परदेशात जन्मलेली होती. याशिवाय दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक वसाहती स्वतंत्र झाल्यामुळे आशियायी राष्ट्रांनी आज स्थलांतरावर मोठ्या प्रमाणावर बंधने घातल्यामुळे नवीन स्थलांतर पूर्णपणे थांबलेच शिवाय पूर्वीचेही स्थलांतरितही मूळ देशात पाठविण्यात आले. उदा., 1961 मध्ये इंडोनेशियातून चीनमध्ये सुमारे एक लाखापेक्षा जास्त लोक पाठविले गेले, तसेच श्रीलंका, म्यानमार व मलेशियातूनही भारतीयांचे स्थलांतर थांबविले गेले.
आफ्रिकन लोकांचे आंतरराष्ट्रीय स्थलांतर:  
दुसऱ्या महायुद्धानंतर इ.स. 1946 ते 1964 या काळात 2.5 दशलक्ष आज स्थलांतरित युरोपमधून दक्षिण आफ्रिकेत पाठविण्यात आले. त्यातील 3/5 इंग्लंडमधून आलेले होते. आफ्रिकेतील युरोपियनांच्या वसाहतीच्या स्वातंत्र्यानंतर विविध आफ्रिकन देशातून युरोपीय लोक व उत्तर अमेरिकन लोक मूळ देशात परतले. उदा., उत्तर आफ्रिकेतून एक दशलक्ष, अल्जेरियातून 9 लाख तसेच 1957 साली सुवेझ प्रकरणानंतर युनायटेड अरब रिपब्लिकमधून पुष्कळ युरोपियन परत गेले. 1964 साली करार करून नेलेले मजूर मोठ्या प्रमाणात आफ्रिकेत परतले. 1964 साली देखील पूर्व आफ्रिकन देशात (केनिया, युगांडा) भारतीय व युरोपियनांचे प्रमाण 4:51 असे होते. याशिवाय आफ्रिका खंडाच्याच एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात होणारे स्थलांतर हा आफ्रिकेतील महत्त्वाचा प्रकार आहे. शेती, खाणकाम, उद्योग यासाठी मोठ्या प्रमाणावर आफ्रिकन लोकांना स्थलांतरित केले जातात. उदा., 1960 च्या जनगणनेत धाना असे दिसून आले की एकूण लोकसंख्येतील दर 12 माणसांमागे 1 माणूस परदेशी आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरची आफ्रिकेतील व आफ्रिकेतून झालेली आंतरराष्ट्रीय स्थलांतरे वांशिक, भाषिक भिन्नतेशी निगडित असून, काही प्रदेशातील दुर्मीळ साधनसंपत्तीवर पडणारा वाढत्या लोकसंख्येचा ताण हे त्याचे कारण आहे. 
***************

मृत्युदर

मृत्युदर 
संयुक्त राष्ट्रसंघ व जागतिक आरोग्य संघटना यांनी मृत्यू, गर्भमृत्यू व अर्भक मृत्यू यांच्या व्याख्या पुढीलप्रमाणे केलेल्या आहेत. 
 मृत्यू :व्यक्तींचा जन्म झाल्यानंतर केव्हाही ती व्यक्ती जिवंत असल्याचा जर सर्व पुरावा कायमचा नष्ट झाला तर त्या घटनेस मृत्यू असे म्हणतात. गर्भमृत्यू : मानवी गर्भाचा गर्भाअवस्थेतच मृत्यू झाला तर त्यास गर्भमृत्यू असे म्हणतात. अर्भक मृत्यू जर जन्मलेले बालक एका वर्षाच्या आत मृत्यू पावल्यास त्यास अर्भक मृत्यू असे म्हणतात. 

मृत्युदर मापनाची परिमाणे:   ढोबळ मृत्युदर, वय सापेक्ष मृत्युदर, वय व लिंग सापेक्षदर , बालमृत्यू दर 
ढोबळ मृत्युदर : ढोबळ मृत्युदर म्हणजे दरवर्षी दर हजार व्यक्तींमागे घडणारे मृत्यू होय.
वय सापेक्ष मृत्युदर : एखाद्या वर्षात विशिष्टगटातील दरहजारी लोकसंख्येमागे त्याच वयोगटातील मृत पावलेल्या व्यक्तींचे प्रमाण म्हणजे वयसापेक्ष मृत्युदर होय. वयसापेक्ष मृत्युदर काढण्यासाठी खालील सूचा उपयोग केला जातो. 
वय व लिंगसापेक्ष मृत्युदर : मृत्युदराचे प्रमाण जसे वयानुसार भिन्न असते तसेच लिंगानुसारही भिन्न असते. वय व लिंगसापेक्ष मृत्युदराला लोकसंख्येच्या अभ्यासात महत्त्वाचे स्थान आहे. कारण मृत्युदराचे प्रमाण स्त्री-पुरुषात वेगवेगळे असते. वय व लिंगसापेक्ष मृत्युदरात स्त्रिया व पुरुषांचे प्रमाण वयोगटानुसार वेगवेगळे करून मृत्युदर काढला जातो. यासाठी खालील सूत्राचा उपयोग करून वय व लिंगसापेक्ष मृत्युदर काढला जातो.
बालमृत्यू दर : साधारणपणे एक वर्ष वयापर्यंतच्या मुलामुलींना बालके किंवा अर्भके असे संबोधले जाते. बालमृत्यू दर काढताना याच वयोगटातील लोकसंख्या व त्यातील मृत्यू विचारात घेतले जातात. बालमृत्यू दर काढणे हे अनेक दृष्टीने महत्त्वाचे ठरते  प्रमाण जास्त आढळले, तर त्यामागे असलेली कारणे उदा., कुपोषण, साथीचे रोग, लसीचा अभाव इत्यादी शोधून त्यावर उपाययोजना करणे शक्य होते. बालमृत्यू दर काढण्यासाठी खालील सूत्राचा उपयोग केला जातो.
मृत्युदरावर परिणाम करणारे घटक:  
वैवाहिक स्थिती : सर्वसाधारणपणे विवाहित व्यक्तीचे मृत्युदर अविवाहित व्यक्तींपेक्षा कमी असतो. कारण वैवाहिक जीवनात कौटुंबिक स्वास्थ्य, समाधान, जीवनाबद्दल दक्षता व सुरक्षितता, एकमेकांची काळजी घेतली जात असल्याने मृत्युदर कमी असतो. तर याउलट, अविवाहित व्यक्ती स्वैर व छंदिष्ट जीवन, व्यसनाधीनता, अनियंत्रण, एकाकीपणा, चिंताग्रस्त असल्यामुळे शारीरिक व मानसिक असंतुलन निर्माण होऊन मृत्युदराचे प्रमाण वाढते. 
व्यवसायाचे स्वरूप:  व्यक्तीच्या उपजीविकेचे साधन व जेथे ती व्यक्ती काम करत असते तेथील परिस्थितीचा व्यक्तीच्या मृत्युदरावर परिणाम होतो. शेतीशी निगडित कष्ट करणाऱ्या व्यक्तींना शारीरिक व्यायाम, शुद्ध व स्वच्छ पर्यावरण उपलब्ध असल्यामुळे मृत्युदराचे प्रमाण कमी आढळते. मात्र सूतगिरण्यातील मजूर, रंगकाम करणारे, कोळसा खाणीतील खाण कामगार यांच्यामध्ये श्वसनसंस्थेचे आजार अधिक प्रमाणात आढळतात. उदा., क्षयरोग, दमा इत्यादी. तसेच धातू शुद्धीकरण केंद्र, पेट्रोकेमिकल्स उद्योग, रासायनिक उद्योग, वाहतूक व्यावसायिक, सागरी मासेमारी, औद्योगिक कामगार इत्यादींना धोकादायक कामे करावी लागतात. त्यांच्यामध्ये अपघाताने मरणाऱ्यांचे प्रमाण जास्त असते. 
शिक्षण: शिक्षणामुळे व्यक्ती स्वच्छता व आरोग्याविषयी दक्ष असते. स्वतः प्रमाणेच कुटुंबातील इतर व्यक्तींची विशेषता मुलांची काळजी घेतली जाते. त्यामुळे सुशिक्षितांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी असते. सुशिक्षित लोकांची आर्थिक व सामाजिक स्थिती समाधानकारक असते. याउलट, अशिक्षित लोकांमध्ये व्यक्तींमध्ये आरोग्याची काळजी घेतली जात नाही. बऱ्याच वेळा बेफिकिरी, निष्काळजीपणा इ. आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने मृत्युदर अधिक आढळतो.
ग्रामीण व नागरी प्रदेश : शहरांमध्ये नागरी सुविधा, वैद्यकीय सोईसुविधा व स्वच्छ शुद्ध पाणीपुरवठ्यामुळे तसेच राहणीमानाचा उच्च दर्जा, सामाजिक व आर्थिक स्थिती उत्तम असल्यामुळे सर्वसामान्य मृत्युदर कमी आढळतो. याउलट, ग्रामीण भागात दारिद्र्य, बेरोजगारी, आर्थिक व सामाजिक कुचंबणा, निम्न राहणीमानाचा दर्जा, वैद्यकीय सोईसुविधांचा अभाव, वाहतूक व दळणवळण साधनांचा अभाव यांमुळे मृत्युदराचे प्रमाण जास्त असते.
वयसंरचना : वयसंरचनेचा मृत्युदरावर परिणाम होतो. कोणत्याही देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासामध्ये राहणीमानाचा दर्जा उंचावून बालमृत्यूचे प्रमाण घटते. त्यामानाने प्रौढांचे व वृद्धांचे मृत्यू सावकाश होतात. यामुळे विकसित राष्ट्रांमध्ये बालमृत्यू दर कमी तर विकसनशील देशात जास्त असतो. 
लिंग संरचना: जगातील वेगवेगळ्या देशात पुरुष आणि स्त्री यांच्या मृत्युदराची पातळी वेगवेगळी आढळते. निसर्गतः स्त्रियांचे आयुर्मान पुरुषांपेक्षा जास्त आढळते. त्यामुळे पुरुषांचा मृत्युदर जास्त आढळतो. मात्र स्त्रियांना दिली जाणारी दुय्यम वागणूक, वारंवार होणारी बाळंतपणे, निकृष्ट आहार, मानसिक व शारीरिक छळ इत्यादींचा परिणाम होऊन स्त्रियांचा मृत्युदर वाढतो. 
तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार:  तंत्रज्ञानात जे देश आघाडीवर आहेत अशा देशांमध्ये सामाजिक, आर्थिक व वैद्यकीय क्रांती होऊन मृत्युदरात घट झाल्याचे दिसून येते. विकसित राष्ट्रांपेक्षा अविकसित व विकसनशील देशात तंत्रज्ञानाची प्रगती कमी झाल्यामुळे मृत्युदराचे प्रमाण जास्त असते
नैसर्गिक आपत्ती:  ज्या प्रदेशात वारंवार महापूर, भूकंप, दुष्काळ, भूमिपात, ज्वालामुखी, चक्रीवादळे, त्सुनामी, विजा पडणे इत्यादी नैसर्गिक आपत्ती येतात. अशा प्रदेशात मृत्युदराचे प्रमाण अधिक असते.
मृत्युदराचे  परिणाम : 
  • जगात मृत्युदराचे प्रमाण सर्वत्र सारख्या प्रमाणात दिसून येत नाही. मृत्युदरावर अनेक घटकांचा परिणाम झालेला दिसून येतो
  • जास्त मृत्युदरामुळे जागतिक लोकसंख्येत घट होते.
  • मृत्युदराचे प्रमाण जास्त असल्यास श्रमशक्तीचा अभाव आढळतो त्यामुळे देशाचा विकास खुंटला जातो.
  •  मृत्युदराचे प्रमाण जास्त असल्याने लोकसंख्येचा आकार कमी होऊन स्थानिकबाजारपेठेतील उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होत नाही.
  • मृत्युदरात वृद्धांचे प्रमाण जास्त असल्यास तरुणांना दिशा दाखविणाऱ्यामार्गदर्शकांची कमतरता जाणवते. 
  •  मृत्युदर वाढल्यास अनेक सामाजिक समस्या निर्माण होतात.
  • मृत्युदर जास्त झाल्यामुळे लोकसंख्येत घट होऊन घटल्या लोकसंख्येमुळे साधनसंपत्तीचा योग्य प्रकारे विनियोग होत नाही.
  • मृत्युदराचे प्रमाण जास्त असल्यास लोकसंख्येत घट होऊन देशाच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण होतो
  • मृत्युदराचे प्रमाण जास्त असल्यास लोकसंख्येत घट होते व नैसर्गिक व आर्थिक साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊन राहणीमानाचा दर्जा उंचावतो.
*****


Sunday, November 20, 2022

लोकसंख्या गतिमानता संकल्पना


गतिमानता हे लोकसंख्येचे जीवशास्त्रीय वैशिष्ट्य आहे. लोकसंख्येमध्ये  स्थल-कालपरत्वे बदल होत असतो. हा बदल सकारात्मक (धनात्मक) किंवा हा बदल नकारात्मक (ऋणात्मक) असू शकतो. लोकसंख्येतील बदल हा संख्यात्मक किंवा टक्केवारीत सांगितला जातो. लोकसंख्येतील बदल हा कोणत्याही प्रदेशाच्या आर्थिक विकासाचा एक प्रमुख निर्देशांक असतो. कोणत्याही प्रदेशातील लोकसंख्या कमी असल्यास तेथील गरिबी कमी करणे शक्य होते.

 

व्याख्या

  •  लोकसंख्येच्या आकारात व रचनेत होणारी वाढ व घट यास लोकसंख्येची गतिमानता असे म्हणतात. 
  • कोणत्याही प्रदेशातील रहिवाशांच्या संख्येत विशिष्ट कालावधीत झालेल्या बदलास लोकसंख्येतील बदल असे म्हणतात.

         जगातील बहुतेक देशात 5 किंवा 10 वर्षांच्या अंतराने जनगणना केल्या जातात. कोणत्याही देशाच्या लागोपाठच्या 2 जनगणनेमधील लोकसंख्याविषयक आकड्यांची तुलना करून त्या देशातील लोकसंख्येतील गतिमानता मोजता येते. उदा., 2001 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 102 कोटी होती व 2011 च्या जनगणनेनुसार ती 121 कोटी झाली. म्हणजेच दहा वर्षांच्या काळात भारताच्या लोकसंख्येत 19 कोटी वाढ झाली.

            लोकसंख्येतील बदल म्हणजे केवळ आकड्यातच नव्हे तर रचनेत व वैशिष्ट्यात देखील होत असतो . जागतिक स्तरावर जन्मदर आणि मृत्युदरामुळे लोकसंख्येच्या आकारात बदल होतो. लोकसंख्येतील बदल मोजणे ही लोकसंख्याशास्त्रीय विश्लेषणाची प्रमुख बाजू आहे. बहुतेक देशांच्या जनगणनांच्या अहवालात त्या आधीच्या जनगणनेनंतरच्या काळात लोकसंख्येत झालेला एकूण निरपेक्ष बदल व शेकडा बदल दाखविलेला असतो.लोकसंख्येतील सापेक्ष वाढ शेकडेवारीत मोजणे आवश्यक ठरते. लोकसंख्याशास्त्रज्ञ दोन सलग जनगणनेमधील शेकडा वाढ हे परिमाण मानून लोकसंख्येतील बदल मोजतात व त्यातील वाढीची तुलना करतात
        एखाद्या देशाच्या लोकसंख्येतील बदल सलग दोन जनगणनेच्या आकड्यांच्या साहाय्याने अभ्यासता येतो. सलग दोन जनगणनाच्या फरकावरून लोकसंख्यावाढीचे बरेचसे विश्वसनीय आकडे मिळू शकतात. उदा., युरोपियन, अमेरिकन, ऑस्ट्रेलियन, जपानी किंवा भारतीय अभ्यासक दोन जनगणनेमधील फरकावरून आपल्या देशाच्या लोकसंख्यावाढीचे बरेचसे अचूक अंदाज बांधू शकतात.
लोकसंख्येतील बदल शेकडेवारीत पुढील सूत्राने काढला जातो.
 

लोकसंख्या बदलाचे घटक :

जन्मदर, मृत्युदर व स्थलांतर हे लोकसंख्या बदलाचे प्रमुख तीन घटक आहेत.









Friday, November 18, 2022

जन्मदर

जन्मदर / जननदर: 

लोकसंख्येत बदल घडवून आणणारा जनन हा एक प्रमुख घटक असल्यामुळे लोकसंख्येच्या गतिमानतेचा अभ्यास करताना मानवी जननाचा अभ्यास केला जातो. व्यक्तीच्या मृत्यूमुळे लोकसंख्येत होणारी घट भरून काढून समाजाची पुन:स्थापना होण्याची प्रक्रिया जननामुळेच अखंडपणे चालू असते. 

व्याख्या: 

  • जनन म्हणजे एखाद्या स्त्रीने किंवा स्त्रियांच्या समूहाने केलेले प्रत्यक्ष प्रजोत्पादन म्हणजे जनन होय
  • जन्म देण्यास योग्य असलेल्या वयोगटातील स्त्रीने प्रत्यक्ष जन्म दिलेल्या मुलांची संख्या होय
  • नवीन जन्माला आलेल्या बालकांमुळे ज्या दरामध्ये लोकसंख्येत भर पडतो त्यास जननदर असे म्हणतात

जन्मदर मापनाची परिमाणे 

  • ढोबळ जन्मदर 
  • सामान्य जन्मदर
  • वयसापेक्ष जन्मदर 
ढोबळ जन्मदर : जनन मापनाचे अत्यंत सोपे, नेहमी वापरात असलेले परिमाण म्हणजे ढोबळ  जन्मदर होय, 
"एखाद्या विशिष्ट प्रदेशातील विशिष्ट वर्षातील एक हजार लोकसंख्येमागे जन्मलेल्या अर्भकांची संख्या म्हणजे ढोबळ जन्मदर होय." 

एखाद्या समाजात दरवर्षी दरहजारी किती जन्म होतात, त्या जन्मावरून समाजातील जन्मदर समजतो. ढोबळ जन्मदरांचा प्रमुख उपयोग म्हणजे जननामुळे लोकसंख्येत कसा बदल होतो ते दाखविले जाते. उदा. एखाद्या प्रदेशातील ढोबळ जन्मदर दरवर्षी दरहजारी 40 असेल तर त्या प्रदेशात जननांमुळे दरवर्षी दरहजारी 40 व्यक्तींची भर पडते. ढोबळ जन्मदरात कोणत्याही प्रदेशातील सर्व लोकसंख्येचा समावेश केला जातो. मात्र ती सर्वच लोकसंख्या जन्म देण्यास सक्षम असेलच असे नाही. त्यामुळे ढोबळ जन्मदर अधिक परिणामकारक ठरू शकत नाही.

सामान्य जन्मदर: ढोबळ जन्मदरापेक्षा हे सुधारित जन्मदराचे परिमाण आहे. या जन्मदर प्रकारात ज्याचा प्रत्यक्षात जन्मदराशी संबंध आहे. अशाच वयोगटातील स्त्रियांचा समावेश आहे. विशिष्ट प्रदेशातील एका वर्षातील जन्माच्या संख्येचे 15 ते 49 या वयोगटातील स्त्रियांच्या संख्येशी गुणोत्तर काढून त्याला 1000 ने गुणून दरहजारी साधारण जन्मदर निश्चित करतात. 

या जन्मदर प्रकारात प्रजननक्षम वयोगटातील स्त्रियांचाच फक्त विचार केलेला असतो. त्यामुळे ढोबळ जन्मदरातील त्रुटी या जन्मदरात कमी झालेल्या आहेत. असे जरी असले तरी या जन्मदरात काही उणिवा असतात. उदा., सर्वच प्रजननक्षम स्त्रियांचा विवाह होतोच असे नाही. तसेच प्रत्येक स्त्रियांमध्ये जननक्षमता वेगवेगळी असते. या काही त्रुटी वगळता हा जन्मदर ढोबळ जन्मदरापेक्षा चांगला प्रकार मानला जातो.
वयसापेक्ष जन्मदर: ढोबळ जन्मदरापेक्षा हे सुधारित जन्मदराचे परिमाण आहे. या जन्मदर प्रकारात ज्याचा प्रत्यक्षात जन्मदराशी संबंध आहे. अशाच वयोगटातील स्त्रियांचा समावेश आहे. विशिष्ट प्रदेशातील एका वर्षातील जन्माच्या संख्येचे 15 ते 49 या वयोगटातील स्त्रियांच्या संख्येशी गुणोत्तर काढून त्याला 1000 ने गुणून दरहजारी साधारण जन्मदर निश्चित करतात. 


वयसापेक्ष जननदर निश्चित करताना विशिष्ट वयोगटातील स्त्रियांनी जन्म दिलेल्या अर्भकांचीच संख्या विचारात घ्यावी लागते. या मुलांच्या संख्येचे त्याच वयोगटातील स्त्रियांशी गुणोत्तर काढून त्याला 1000 ने गुणले की त्या वयोगटातील 1000 स्त्रियांमागे असलेला सरासरी जन्मदर कळतो.

जन्म दरावर परिणाम करणारे घटक:

जीवशास्त्रीय कारणे:
प्रजोत्पादनाचा कालावधी: व्यक्तीचे वय व लिंग या दोन घटकांचा प्रजननावर परिणाम होतो. मुलास जन्म स्त्रीकडून दिला जात असून सामान्यपणे वयाच्या 15 वर्षापासून ते 49 वर्षांपर्यंत स्त्री अपल्याला जन्म देऊ शकते. प्रजोत्पादनाचा कालावधीमध्ये 20 ते 25 वयात अपत्यनिर्मिती क्षमता सर्वांत जास्त असते, यानंतर वाढत्या वयानुसार अपत्यनिर्मिती क्षमता कमी-कमी होत जाते. 
वंश व वांशिक समूह : वंश हा जननदरावर परिणाम करणारा सर्वांत महत्त्वाचा जीवशास्त्रीय घटक आहे. वेगवेगळ्या वांशिक समूहानुसार जननदर बदलतो. कॉकेसाइड वंशाच्या लोकांपेक्षा निग्रोइड वंशाच्या लोकांचा जन्मदर जास्त आढळतो. 
वंध्यत्व : काही स्त्रिया या शारीरिक दोषांमुळे प्रजननक्षम नसतात, स्त्रियांना गर्भधारणाच होत नाही, तर काही स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर किंवा 1-2 अपत्यांच्या जन्मानंतर वंध्यत्व येते. तर कित्येक स्त्रियांना अपत्य जन्मानंतर काही काळ गर्भधारणेची शक्यता कमी असते व जन्मदर कमी होतो. 
आहार : सकस व पौष्टिक आहार उपलब्ध असल्यास प्रजनन क्षमता वाढून जन्मदराचे प्रमाण जास्त आढळते. याउलट, निकृष्ट व कमी प्रतीचा आहार मिळाल्यामुळे प्रजनन क्षमता घटून जन्मदराचे प्रमाण कमी होते. निकृष्ट आहारामुळे अशक्तपणा येऊन गर्भपात होतो. 
आरोग्य : आरोग्याचा व्यक्तिगत जननक्षमतेशी संबंध असतो. निरोगी शरीर असणाऱ्या स्त्रियांमध्ये जननक्षमता जास्त आढळते. तर याउलट शारीरिक व मानसिक आरोग्य प्रतिकूल स्वरूपाचे असल्यास जननदरावर परिणाम होऊन जननदर घटतो. 
हवामान : प्रदेशानुसार हवामानामध्ये विविधता दिसून येते. हवामानाचा जननदरावर परिणाम होतो. उष्ण कटिबंधीय हवामानात मुली लवकर विवाहास योग्य ठरतात, अशा मुलींचे विवाह लवकर झाल्यामुळे त्यांना प्रजोत्पादनाचा कालावधी अधिक मिळतो, त्यामुळे जन्माचे वाढते.
लोकसंख्याशास्त्रीय कारणे : जननदरावर परिणाम करणारा लोकसंख्याशास्त्रीय घटक महत्त्वाचा असून यामध्ये वय संरचना, लिंग संरचना, शहरीकरणाचे प्रमाण, वैवाहिक जीवनाचा काळ व स्त्रियांचा श्रमशक्तीतील सहभाग इ. समावेश होतो.
वय संरचना : ज्या देशात प्रजोत्पादनक्षम वयातील म्हणजेच तरुणांचे प्रमाण जास्त त्या देशाचा जननदर जास्त होऊन लोकसंख्येत वाढ होते. आशिया, आफ्रिका व दक्षिण अमेरिकेतील बऱ्याचशा देशात अशी परिस्थिती आढळते.
लिंग संरचना : ज्या देशात स्त्री व पुरुषांचे प्रमाण समसमान असल्यास तेथे सामान्य सरासरी जन्मदर आढळतो. याउलट, ज्या प्रदेशात स्त्री व पुरुषांचे प्रमाण असमान असते तेथे जननदरावर विपरीत परिणाम होतो. उदा., भारतासारख्या देशात शहरांमध्ये पुरुषांचे प्रमाण स्त्रियांपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे शहरातील जन्मदर खेड्यांपेक्षा खूपच कमी आढळतो.
शहरीकरणाचे प्रमाण : नागरीकरणाचा परिणाम जननदरावर होतो. शहरी भागात काम, शिक्षण व इतर कारणाने स्थलांतर करण्याचे तरुणांचे प्रमाण जास्त असते. शहरात पुरुषांचे प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त आढळते. त्यामुळे शहरी भागात खेड्यांपेक्षा जन्मदराचे प्रमाण कमी आढळते.
वैवाहिक जीवनाचा काळ : वैवाहिक जीवनाचा काळ जास्त असल्यास जननाचे प्रमाण जास्त आढळते. उदा., भारतासारख्या देशात विवाह लवकर होत असल्याने वैवाहिक जीवनाचा काळ जास्त असल्याने जननदर वाढते.
स्त्रियांचा श्रमशक्तीतील सहभाग : विविध व्यवसायात काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या जास्त असेल तर जन्मदराचे प्रमाण कमी असते. कारण काम करणाऱ्या स्त्रिया या आपल्या अधिकाराच्या बाबतीत जास्त सजग असतात. आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याने व शिक्षणामुळे कुटुंब मर्यादित ठेवण्याकडे स्त्रियांचा कल असतो. विकसित देशात स्त्रिया या पुरुषांच्या बरोबरीने पूर्णवेळ कार्यरत असल्याने फुरसतीचा वेळ कमी मिळतो, त्यामुळे जननदर कमी असतो.
सामाजिक कारणे : 
धर्म: प्रत्येक धर्माचे जीवनविषयक तत्वज्ञान भिन्न असते. ख्रिश्चनव इस्लाम धर्मामध्ये अधिकाधिक मुलांना जन्म देण्यास मान्यता आहे. त्यामुळे या धमतिजननाचे प्रमाण जास्त असते.
शिक्षण : ज्या देशात साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे. तेथे जन्मदराचे प्रमाण कमी आढळते. कारण या देशात राहणीमानाचा दर्जा उच्च कुटुंब लहान ठेवण्याकडे कल आढळतो. तर याउलट ज्या देशात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. तेथे जननदराचे प्रमाण जास्त आढळते. कारण कमी शिक्षित लोकांचे विवाह लवकर होतात, त्यामुळे प्रजोत्पादनाचा कालावधी जास्त मिळतो. 
घटस्फोट: घटस्फोट हा प्रजोत्पादनाच्या काळात झाला तर जननदर कमी आढळतो. मात्र वंध्यत्व असेल तर घटस्फोटाचा जननावर परिणाम होत नाही. ज्या देशात घटस्फोटाचे प्रमाण जास्त आहे तेथे जननदर कमी आढळते.
ऐच्छिक गर्भपात: गर्भपातामुळे जननाचे प्रमाण कमी होते. ज्या देशात कायदेशीर गर्भपातास मान्यता असते. तेथे जननाचे प्रमाण कमी होते. उदा. जपान या देशात पूर्वी ही परिस्थिती होती. सध्या या देशात कुटुंबनियोजनाचा प्रभाव झालेला दिसून येतो.
सामाजिक बंधने व समाजाच्या रूढी व परंपरा : मुले ही देवाची देणगी मुलगा हा वंशाचा दिवा, मुले म्हातारपणात आधार देतील, जास्त अपत्य असल्यास कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारेल अशा अनेक अंधश्रद्धा व रूढीमुळे जननाचे प्रमाण वाढते. काही समाजामध्ये पती-पत्नीच्या लैंगिक संबंधावर विशिष्ट वेळेला काही सामाजिक बंधने असतात. 
बहुपत्नीत्व: बहुपतित्व म्हणजे एकापेक्षा जास्त नवरे केले जातात. तर बहुपत्नीत्व म्हणजे एकापेक्षा जास्त बायका करणे होय. काही समाजात बहुपत्नीत्वापेक्षा बहुपतित्वाचे प्रमाण खूपच कमी असते. बहुपत्नीत्वाने जनन पातळी घटते.
आर्थिक कारणे : आर्थिक घटकांत कुटुंबाचे उत्पन्न,औद्योगिकीकरण व व्यवसायाचे स्वरूप इत्यादींचा समावेश होतो. 
कुटुंबाचे उत्पन्न : ज्या कुटुंबाचे उत्पन्न कमी असते,अशा कुटुंबात जन्मदर  जास्त आढळतो . याउलट ज्या कुटुंबाचे उत्पन्न जास्त असते अशा कुटुंबात जन्मदर कमी आढळतो. ज्या कुटुंबाचे उत्पन्न फारच कमी असते, अशा कुटुंबाचा जन्मदर फारच जास्त असतो, कारण जास्त मुलांमुळे आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारेल अशी आशा असते. ज्या कुटुंबाचे उत्पन्न फार जास्त असते अशा कुटुंबाचा जन्मदर फारच कमी असतो.
औद्योगिकीकरण : औद्योगिकीकरणामुळे औद्योगिक नगरे निर्माण होत आहेत. या औद्योगिक नगरात लोकांना रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने अनेक तरुण अशा नगराकडे स्थलांतरीत होत आहेत. त्यामुळे अशा नगराची लोकसंख्या दाट होऊन अनेक समस्या निर्माण होतात. नगरात विविध क्षेत्रांत मोठी स्पर्धा निर्माण होत असल्याने नगरातील कुटुंबाचा कल अपत्याची संख्या मर्यादित ठेवण्याकडे असतो. 
व्यवसायाचे स्वरूप : मानवाच्या आर्थिक व्यवसायाचाही जननदरावर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसून येतो. सर्वसामान्यपणे प्राथमिक व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांमध्ये जननदराचे प्रमाण जास्त असते उदा., शेती, खाणकाम इत्यादी तसेच द्वितीयक, तृतीयक व चतुर्थक व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांमध्ये जननदराचे प्रमाण कमी असते. उदा., वकील, डॉक्टर, व्यापारी, शिक्षक इत्यादी.
जन्मदराचे परिणाम 
  • जागतिक लोकसंख्येतील प्रचंड वाढीस जननदर हाच एकमेव घटक कारणीभूत असतो. 
  • जन्मदराचे प्रमाण जास्त असल्याने श्रमशक्तीचा पुरवठा होतो. 
  • जन्मदराचे प्रमाण जास्त उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होते. 
  • जननदर जास्त असल्याने तरुणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढून देशाचा सर्वांगीण विकास होतो.
  • ज्या देशात जन्मदराचे प्रमाण जास्त असते, त्या देशात तरुणांचे प्रमाण वाढून देशाच्या संरक्षणासाठी मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते.
प्रतिकूल परिणाम
  • ज्या देशात जननदर जास्त असतो त्या देशात लोकसंख्या वेगाने वाढून लोकसंख्येचा विस्फोट होतो.
  • जननदर अपुरा किंवा कमी असल्यास तसेच अतिरिक्त असल्यास अनेक सामाजिक समस्या निर्माण होतात.
  • जननदर जास्त असल्याने राष्ट्रीय उत्पन्न जास्त लोकसंख्येत विभागले जाऊन दरडोई उत्पन्न घटते व राहणीमानाचा दर्जा खालावतो.
  • जननदर जास्त असल्यास लोकसंख्येचा विस्फोट होऊन शेतजमिनीचे विभाजन किंवा तुकडीकरण होते. 
  • जननदर जास्त असल्यामुळे लोकसंख्येत वाढ होऊन वाढत्या लोकसंख्येचासाधनसंपत्तीवर अतिरिक्त ताण पडतो.
  • जननदर जास्त असल्यामुळे बेरोजगारी ही समस्या निर्माण होते.
  • जननदर जास्त असलेल्या प्रदेशात वाढत्या लोकसंख्येमुळे पर्यावरणीय समस्या निर्माण होतात


Thursday, November 17, 2022

जागितक लोकसंख्यावाढ

जागतिक लोकसंख्यावाढ

लोकसंख्या ही एक साधनसंपत्ती आहे. लोकसंख्या ही संख्यात्मक व गुणात्मक असते. जर लोकसंख्या कर्तृत्ववान व गुणात्मक असेल तर प्रदेशाचा विकास जलद घडून येतो. लोकसंख्या जेवढी जास्त तेवढी श्रमशक्ती वाढते. तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीचा विकास करण्यासाठी प्रत्येक देशाजवळ पुरेशी व गुणात्मक लोकसंख्या असणे आवश्यक असते. राष्ट्राच्या आर्थिक उत्पादनाबरोबरच त्या राष्ट्राचे सार्वभौमत्व, संरक्षण व राष्ट्रीयदृष्ट्या राष्ट्राचा विकास घडवून आणण्यासाठी लोकसंख्येला महत्त्वाचे स्थान असते

जागतिक लोकसंख्यावाढ :

लोकसंख्यावाढ ही धन (+) व ऋण (-) देखील असू शकते. लोकसंख्येत झालेला बदल जनगणनेनुसार दर दहा वर्षांनी समजू शकतो. लोकसंख्यावाढीचा वेग ठरविताना वार्षिक कालावधी विचारात घेतला जातो. जगात लोकसंख्येची वाढ सर्वत्र समान आढळत नाही, कारण लोकसंख्येच्या वाढीवर भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक या लोकसंख्याविषयक घटकांचा परिणाम होतो. मुख्यतः लोकसंख्येची वाढ, जन्मदर, मृत्युदर व स्थलांतर या घटकांवर अवलंबून असते.

इ.स. 1300 मध्ये 40 कोटी - इ.स. 1650 मध्ये जगाची लोकसंख्या 50 कोटी होती. यानंतर जगाच्या लोकसंख्येत सातत्याने वाढ होत गेली. इ.स. 1650 नंतर पुढील 200 वर्षांत म्हणजेच इ.स. 1850 मध्ये जगाची लोकसंख्या दुप्पट (100 कोटी) झाली. पुढील 80 वर्षांत म्हणजेच 1930 मध्ये ती दुप्पट (200 कोटी) झाली. जगातील लोकसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 200 वर्षे, 80 वर्षांवरून ती 45 वर्षे असा घटलेला आहे. म्हणजेच इ.स. 1975 मध्ये जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली. या जलद व प्रमाणाबाहेर वाढणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणाला 'लोकसंख्येचा विस्फोट' असे म्हणतात. या वाढत्या लोकसंख्येमुळे जगात निर्माण झालेला असमतोल व परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने (UNO) 1974 हे वर्ष 'जागतिक लोकसंख्या वर्ष म्हणून घोषित केले, तर 11 जुलै, 1987 रोजी जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली म्हणून यूनोने 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून घोषित केला. 12 वर्षांनंतर म्हणजेच 12 ऑक्टोबर, 1999 या दिवशी जगाची लोकसंख्या 600 कोटी झाली, 31 ऑक्टोबर, 2011 रोजी जगाची लोकसंख्या 700 कोटी झाली तर 2019 मध्ये ती 750 कोटी झाली.

जागतिक लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक

जगात लोकसंख्येचे वितरण विषम स्वरूपाचे आहे कारण त्यावर पुढील घटकांचा प्रभाव पडतो

भौगोलिक किंवा नैसर्गिक किंवा भौतिक/ प्राकृतिक घटक :

लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा भौगोलिक हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. भौगोलिक घटकामध्ये प्राकृतिक रचना, हवामान, जमीन, नैसर्गिक वनस्पती, पाणीपुरवठा, खनिजे व ऊर्जा साधने यांचा समावेश होतो.

प्राकृतिक रचना / भूरचना :

लोकसंख्येच्या वितरणावर फार मोठा परिणाम होतो. प्राकृतिक रचनेत पर्वत, पठारे, मैदान यांचा समावेश होतो. पर्वतीय प्रदेश हे मानवी जीवनासाठी प्रतिकूल असल्याने लोकसंख्या कमी आढळते. पर्वतीय प्रदेश हे ओबडधोबड भूपृष्ठ, तीव्र उतार, घनदाट जंगल, अपरिपक्व मृदा, प्रदेशाची दुर्गमता असल्यामुळे लोकसंख्येचे वितरण विरळ आढळते. उदा. रॉकी, अँडीज, आल्प्स, किलीमांजारो, हिमालय पर्वत इ. पठारी प्रदेश हे पर्वतीय प्रदेशापेक्षा मानवी जीवनास थोडे अनुकूल असतात त्यामुळे लोकसंख्येचे वितरण मध्यम स्वरूपाचे आढळते. जगातील काही पठारी प्रदेशात खनिजसंपत्ती व सुपीक जमिनीमुळे शेतीचा विकास होऊन लोकसंख्या थोडी जास्तआढळते. उदा. आफ्रिकेचे पठार, कोलंबियाचे पठार, ब्राझीलचे पठार मैदानी प्रवेश मानवी जीवनासाठी अनुकूल असल्याने लोकसंख्या सर्वात जास्त आढळते. सपाट भूप्रदेश, सुपीक मृदा मुबलक पाणीपुरवठा, प्रदेशाची सुगमता, औद्योगिक विकास इत्यादींमुळे लोकसंख्या जास्त आढळते. उदा., गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रेचे मैदान, यांगत्सी कंग, यांगत्से, हो सँग-हो नदीचे मैदान, नाईल नदीचे मैदान इ.

हवामान:

हवामान हा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. ज्या प्रदेशात हवामान अनुकूल असते तेथे लोकसंख्या दाट आढळते. याउलट, ज्या प्रदेशात हवामान प्रतिकूल असते तेथे लोकसंख्या विरळ आढळते. अनुकूल हवामानाच्या प्रदेशात शेती, उद्योगधंदे, व्यापार, वाहतूक व दळणवळणाचा विकास होतो म्हणून तेथे लोकसंख्या जास्त आढळते. उदा., भूमध्य सागरी हवामान,मोसमी हवामान,पश्चिम युरोपीय हवामान. याउलट जेथे हवामान प्रतिकूल असते तेथे लोकसंख्या विरळ आढळते. अति उष्ण, अति शीत, अति पर्जन्याचे प्रदेश इत्यादी प्रदेशात लोकसंख्या फारच विरळ आढळते. उदा. सहारा, कलहारी, थर, अटाकामा, इत्यादी बाळवंटी प्रदेश, अलास्का, सैबेरिया, ग्रीनलैंड, अंटार्क्टिका इत्यादी. टुंड्रा हवामानाचा प्रदेश इत्यादी प्रदेशात लोकसंख्या विरळ आढळते.

जमीन किंवा मृदा :

जमीन ही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. जमिनीवरच मानवाचा शेती हा व्यवसाय अवलंबून आहे. ज्या प्रदेशात जमीन सुपीक असते. तेथे शेतीचा विकास होतो, तेथे अन्नधान्य व कृषिमालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने कृषीवर आधारित उद्योगधंद्याचा विकास होतो. म्हणून सुपीक जमिनीच्या प्रदेशात दाट लोकसंख्या आढळते. उदा. गाळाची मृदा, काळी मृदा इ. याउलट ज्या प्रदेशात जमीन नापीक असते त्या प्रदेशात लोकसंख्या विरळ आढळते. उदा.वाळवंटी मृदा, पर्वतीय मृदा इ.

खनिजसंपत्ती :

लोहखनिज, मैगनीज, बॉक्साइट, चांदी, सोने, युरेनियम इत्यादी खनिजे व दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू इत्यादी ऊर्जा साधनांचे साठे ज्या प्रदेशांत मुबलक प्रमाणात आढळतात, त्या प्रदेशात लोकसंख्या जास्त आढळते. उदा., ऑस्ट्रेलियातील कुलगार्डी व कालगुर्डी , भारतातील छोटा नागपूरचे पठार, जर्मनीतील हूर प्रदेश, संयुक्त संस्थानातील पंचमहासरोवरे इ.

पाणीपुरवठा:

मानवाला पिण्यासाठी, शेतीसाठी, घरगुती वापरासाठी, उद्योगधंद्यासाठी, जलविद्युत निर्मितीसाठी, जलसिंचनासाठी, पाण्याची नितांत गरज असते. याच कारणामुळे प्राचीन संस्कृतीचा उदय व विकास नद्यांच्या खोऱ्यात झाला आहे. उदा., रावी नदीकाठी हडप्पा, सिंधू नदीकाठी मोहोंजोदडो, नाईल नदीकाठी इजिप्शियन, युफ्राटिस व तैग्रीस नदीकाठी ग्रीक संस्कृती,पो नदीकाठी इटालियन संस्कृती, होयँग-हो नदीकाठी चिनी संस्कृती इत्यादी.याउलट ज्या प्रदेशात पाण्याचे दुर्भिक्ष असते तेथे लोकसंख्या विरळ आढळते. उदा., उष्ण वाळवंटी प्रदेश.

नैसर्गिक वनस्पती :

नैसर्गिक वनस्पती प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मानवासाठी उपयुक्त असतात. नैसर्गिक वनस्पतीवर लाकूडतोड, कागदनिर्मिती, फर्निचरनिर्मिती, काडीपेटी, जहाजबांधणी निर्मिती, वन्यपदार्थ संकलन इ. उद्योग अवलंबून असतात.आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या जंगलात लोकसंख्या जास्त आढळते. उदा.तैगा अरण्याचे प्रदेश, समशीतोष्ण जंगलाचे प्रदेश. याउलट घनदाट जंगलव्याप्त व वनस्पतीविरहित प्रदेशात लोकसंख्या विरळ आढळते. उदा.उष्ण कटिबंधीय घनदाट जंगलाचा प्रदेश.

आर्थिक घटक :

औद्योगिक विकास:

औद्योगिक विकासामुळे लोकांना रोजगार उपलब्ध होतो. विविध प्रदेशातील लोक औद्योगिक प्रदेशात केंद्रित होतात. अशा भागात लोकवस्ती वाढत जाऊन लोकसंख्या वाढते. उदा., जपानमधील ओसाका, कोबे, याकोहामा, रशियातील मॉस्को जर्मनीतील व हाईन प्रदेश, ग्रेट ब्रिटनमधील मँचेस्टर, संयुक्त संस्थानातील न्यूयॉर्क ते फिलाडेल्फिया औद्योगिक पट्टा, भारतातील मुंबई- पुणे, दिल्ली-अंबाला-मीरत, मदुराई-कोईमतूर, अहमदाबाद-बडोदा, कलोल- अंकलेश्वर, हुगळी औद्योगिक प्रदेश इत्यादी औद्योगिक प्रदेशात लोकसंख्या दाट आढळते.

वाहतूक:

ज्या प्रदेशात वाहतूक व दळणवळण साधनांचा विकास होतो तेथे लोकसंख्या दाट आढळते. कारण वाहतुकीच्या साधनाने प्रवासी, कृषीमाल, खनिजांची वाहतूक होते. त्यामुळे शेती, उद्योग, व्यापार व पर्यटन व्यवसायाचा विकास होतो. उदा., ट्रान्स सैबेरियन, रेल्वेमुळे कोकणचा विकास, भारतीय मैदानी प्रदेशातील रेल्वेमार्गामुळे, संयुक्त संस्थानातील पंचमहासरोवरातील औद्योगिक विकास, भारतातील पूर्व व पश्चि किनारपट्टीवरील बंदरांमुळे लोकसंख्या दाट आढळते. तर याउलट जेथे वाहतुकीची साधने अपुरी असतात तेथे लोकसंख्या कमी आढळते. उदा., अति उंच पर्वतीय प्रदेश, वाळवंटी प्रवेश, घनदाट जंगलाचा प्रदेश इ.

व्यापार:

उत्पादन, वितरण व विनिमय केंद्रे असणाऱ्या ठिकाणी व्यापाराचा विकास होतो. ज्या प्रदेशात व्यापारी केंद्राचा विकास झाला आहे तेथे लोकवस्ती दाट आढळते. उदा. भारतातील मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, ग्रेट ब्रिटनमधील लंडन, लिव्हरकून व मैचेस्टर, संयुक्त संस्थानातील न्यूयॉर्क, बोस्टन, शिकागो इत्यादी चीनमधील शांघाय, जपानमधील टोकिओ, रशियातील मॉस्को, फ्रान्समधील पॅरिस इत्यादी, व्यापारी केंद्रांच्या ठिकाणी आसपासच्या प्रदेशातील माल केंद्रित व विकेंद्रित होतो. अशा ठिकाणी लोकांना रोजगार मिळतो. त्यामुळे लोकसंख्या दाट आढळते.

जलसिंचन:

जलसिंचनाच्या साधनांमध्ये धरणे, कालवे, तलाव, सरोवर यांचा समावेश होतो. ज्या प्रदेशात या साधनांची प्रगती होते तेथे शेती व उद्योगधंद्याचा विकास होत असल्यामुळे लोकसंख्या दाट आढळते उदा., भारतातील गंगा, सिंधू, सतलज, नर्मदा, गोदावरी, कृष्णा, ब्रह्मपुत्रा इ. इजिप्तमधील नाईल, पाकिस्तानातील सिंधू, युरोपातील हाईन, संयुक्त संस्थानातील मिसिसिपी, मिसुरी, चीनमधील हो हँग हो, यांगत्सी कँग इत्यादी नद्यांच्या खोऱ्यात जलसिंचनाच्या सुविधांमुळे लोकसंख्या दाट आढळते.

खाणकाम :

ज्या प्रदेशात खनिजे व ऊर्जा साधनांचे साठे उपलब्ध असतात, अशा प्रदेशात खाणकाम व उद्योगधंद्याची प्रगती होते, प्रदेशात लोकसंख्या जास्त आढळते. उदा. भारतातील छोटा नागपूरचे पठार, सूर प्रदेश संयुक्त संस्थानातील अपिलेशियन पर्वत, दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन, जोहान्सबर्ग, ऑस्ट्रेलियातील मरे - डार्लिंग.

शहरीकरण:

ग्रामीण वस्तीचे रूपांतर नगरामध्ये होते त्या क्रियेस शहरीकरण असे म्हणतात. नगरामध्ये रोजगाराच्या संधी, सेवासुविधांची उपलब्धता, करमणूक व मनोरंजनाची साधने, व्यापार, उच्च राहणीमान इत्यादी घटकांमुळे लोकसंख्या केद्रित होते. उदा., मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, टोकियो, शांघाय, लंडन, मॉस्को, मेलबर्न, कोलंबो, इ.

सामाजिक व सांस्कृतिक घटक:

सामाजिक रूढी, परंपरा व त्याची बंधने, मूलतत्त्वे इत्यादी घटक समाजावर नियंत्रण करीत असतात. ज्या प्रदेशामध्ये मूलभूत सेवासुविधांबरोबरच आरोग्याच्या सेवा, शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी दाट लोकसंख्या आढळते. उदा. पुणे, कोलकाता, मुंबई, केंब्रिज, ऑक्सफर्ड, हॉवर्ड इत्यादी. संस्कृतीचा विकास झालेल्या प्रदेशात लोकसंख्या वाढत जाते

धार्मिक घटक:

धार्मिक कारणांमुळे लोकसंख्यावाढ होते. त्यामुळे लोकसंख्या वितरणात विविधता आढळते. उदा., इस्लाम धर्मातील बहुपत्नीत्व, हिंदू धर्मातील बालविवाह, मुलगा वंशाचा दिवा इत्यादी प्रथांमुळे लोकसंख्या वाढते. तसेच संरक्षणाच्या दृष्टीने विशिष्ट धर्माचे लोक एकत्रित येऊन राहतात. अशा प्रदेशात लोकसंख्या वाढत जाते. त्यामुळेच ढाका से मक्का या अरब प्रदेशात इस्लामधर्मीयांची लोकसंख्या आढळते. तसेच हिंदू बहुल धार्मिक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हिंदूंची लोकसंख्या जास्त आढळते.

ऐतिहासिक घटक:

ऐतिहासिक प्रसिद्ध घटनांमुळे ठिकाणे नावारूपाला येतात त्यामुळे त्या ठिकाणाचे ऐतिहासिक महत्त्व वाढून लोकसंख्या वाढते. उदा., पानिपत (हरियाणा), प्लासी (मध्य प्रदेश), औरंगाबाद, पुणे (महाराष्ट्र), कोलकाता (पश्चिम बंगाल), आग्रा, दिल्ली, उत्तर प्रदेश, विजापूर (कर्नाटक), पॅरिस (फ्रान्स), लंडन (इंग्लंड), वाटर्ली (इटली), तसेच ऐतिहासिक काळातील राजधान्या, किल्ले, राजवाडे, युद्धभूमी, इत्यादी ठिकाणीही ऐतिहासिक महत्त्वामुळे लोकसंख्यावाढ आढळते

राजकीय घटक:

राजकीय घटकांचाही कमी-अधिक प्रमाणात लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होतो. ज्या प्रदेशात अशांतता निर्माण होते तेथे लोकसंख्या कमी आढळते.उदा. भारत - पाकिस्तान सीमा. स्थिर शासनव्यवस्था असलेल्या प्रदेशात शांतता व स्थैर यामुळे सामाजिक, आर्थिक व सामाजिक विकास होऊन लोकवस्ती वाढत जाऊन लोकसंख्येत वाढ होते.

पर्यटन विकासावर परिणाम करणारे घटक

पर्यटन विकासावर परिणाम करणारे घटक  पर्यटन हा एक प्रमुख आर्थिक व्यवसाय असून यामुळे मोठ्या प्रमणावर परकीय चलन प्राप्त होते याशिवाय रोजगाराच्या...