tipeharish.blogspot.com

Sunday, November 20, 2022

लोकसंख्या गतिमानता संकल्पना


गतिमानता हे लोकसंख्येचे जीवशास्त्रीय वैशिष्ट्य आहे. लोकसंख्येमध्ये  स्थल-कालपरत्वे बदल होत असतो. हा बदल सकारात्मक (धनात्मक) किंवा हा बदल नकारात्मक (ऋणात्मक) असू शकतो. लोकसंख्येतील बदल हा संख्यात्मक किंवा टक्केवारीत सांगितला जातो. लोकसंख्येतील बदल हा कोणत्याही प्रदेशाच्या आर्थिक विकासाचा एक प्रमुख निर्देशांक असतो. कोणत्याही प्रदेशातील लोकसंख्या कमी असल्यास तेथील गरिबी कमी करणे शक्य होते.

 

व्याख्या

  •  लोकसंख्येच्या आकारात व रचनेत होणारी वाढ व घट यास लोकसंख्येची गतिमानता असे म्हणतात. 
  • कोणत्याही प्रदेशातील रहिवाशांच्या संख्येत विशिष्ट कालावधीत झालेल्या बदलास लोकसंख्येतील बदल असे म्हणतात.

         जगातील बहुतेक देशात 5 किंवा 10 वर्षांच्या अंतराने जनगणना केल्या जातात. कोणत्याही देशाच्या लागोपाठच्या 2 जनगणनेमधील लोकसंख्याविषयक आकड्यांची तुलना करून त्या देशातील लोकसंख्येतील गतिमानता मोजता येते. उदा., 2001 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 102 कोटी होती व 2011 च्या जनगणनेनुसार ती 121 कोटी झाली. म्हणजेच दहा वर्षांच्या काळात भारताच्या लोकसंख्येत 19 कोटी वाढ झाली.

            लोकसंख्येतील बदल म्हणजे केवळ आकड्यातच नव्हे तर रचनेत व वैशिष्ट्यात देखील होत असतो . जागतिक स्तरावर जन्मदर आणि मृत्युदरामुळे लोकसंख्येच्या आकारात बदल होतो. लोकसंख्येतील बदल मोजणे ही लोकसंख्याशास्त्रीय विश्लेषणाची प्रमुख बाजू आहे. बहुतेक देशांच्या जनगणनांच्या अहवालात त्या आधीच्या जनगणनेनंतरच्या काळात लोकसंख्येत झालेला एकूण निरपेक्ष बदल व शेकडा बदल दाखविलेला असतो.लोकसंख्येतील सापेक्ष वाढ शेकडेवारीत मोजणे आवश्यक ठरते. लोकसंख्याशास्त्रज्ञ दोन सलग जनगणनेमधील शेकडा वाढ हे परिमाण मानून लोकसंख्येतील बदल मोजतात व त्यातील वाढीची तुलना करतात
        एखाद्या देशाच्या लोकसंख्येतील बदल सलग दोन जनगणनेच्या आकड्यांच्या साहाय्याने अभ्यासता येतो. सलग दोन जनगणनाच्या फरकावरून लोकसंख्यावाढीचे बरेचसे विश्वसनीय आकडे मिळू शकतात. उदा., युरोपियन, अमेरिकन, ऑस्ट्रेलियन, जपानी किंवा भारतीय अभ्यासक दोन जनगणनेमधील फरकावरून आपल्या देशाच्या लोकसंख्यावाढीचे बरेचसे अचूक अंदाज बांधू शकतात.
लोकसंख्येतील बदल शेकडेवारीत पुढील सूत्राने काढला जातो.
 

लोकसंख्या बदलाचे घटक :

जन्मदर, मृत्युदर व स्थलांतर हे लोकसंख्या बदलाचे प्रमुख तीन घटक आहेत.









No comments:

Post a Comment

पर्यटन विकासावर परिणाम करणारे घटक

पर्यटन विकासावर परिणाम करणारे घटक  पर्यटन हा एक प्रमुख आर्थिक व्यवसाय असून यामुळे मोठ्या प्रमणावर परकीय चलन प्राप्त होते याशिवाय रोजगाराच्या...