वातावरणाची रचना (Structure of Atmosphere)
तपांबर
स्थितांबर
आयनांबर
बह्यांबर
तपांबर:
पृष्ठभागापासून ११ किलोमीटर उंचीपर्यंत वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला तपांबरअसे म्हणतात. तपांबराची उंची अक्षवृत्त नुसार बदलत जाते. विषुववृत्तावर तपांबराची उंची १६किलोमीटर तर ४५ अंश अक्षवृत्तावर ही ११ किलोमीटर तर ध्रुवावर ती ८ किलोमीटर असते. तपांबराच्या थरात वाढत्या उंचीनुसार तापमान कमी-कमी होत जाते. १६० मीटर उंचीला तापमान १ अंश सेल्सिअसने कमी होते. वातावरणाच्या या थरात उष्णतेचे संक्रमन वहन,अभिसरण व उत्सर्जन या तिन्ही अवस्थांद्वारे होते . तपांबराच्या या थरात ढग, वादळे, पाऊस, विजा चमकणे व मेघगर्जना असे आविष्कार आढळून येतात.
तपस्तब्धी :
तपांबर व स्थितांबर यांना अलग करणाऱ्या तीन किलोमीटर जाडीच्या थरास तपस्तब्धी असे म्हणतात. या विभागात हवेचे तापमान उणे ५६ अंश सेंटिग्रेड असून ते सर्वत्र सारखे असते म्हणून या थरास तपस्तब्धी असे म्हणतात.
स्थितांबर :
तपस्तब्धीनंतर असलेल्या वातावरणाच्या थरास स्थितांबर असे म्हणतात. स्थितांबर या थराचा विस्तार ८० कि.मी. उंचीपर्यंत आहे. मात्र ऋतुमानानुसार व अक्षवृत्तानुसार स्थितांबर याचा विस्तार बदलत जातो. उन्हाळ्यात स्थितांबर या थराचा विस्तार हिवाळ्यापेक्षा जास्त असतो तर विषुववृत्तावर या थराचा विस्तार सर्वाधिक असून ध्रुवाकडे मात्र तो कमी-कमी होत जातो. वातावरणाच्या या थरात उष्णतेचे संक्रमण होत नाही. याशिवाय हवेची हालचाल आर्द्रता, मेघ व धूलिकण इत्यादींचा अभाव असतो.
ओझोनांबर:
स्थितांबरात २५ ते ४० किलोमीटरच्या दरम्यान ओझोन या वायूचे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे वातावरणाच्या या थरास ओझोनांबर असेही म्हणतात. ओझोन हा थर सूर्याकडून येणारी अतिनील किरणांचे शोषण करतो. त्यामुळे पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण होते म्हणून या धरास पृथ्वीचे संरक्षक कवच किंवा संरक्षक छत्री असेही म्हणतात.
आयनांबर :
स्थितांबरानंतर असणाऱ्या वातावरणाच्या थरास आयनांबर असे म्हणतात. वातावरणाच्या या थरात मुक्त आयन असून ते विद्युतभारित असतात म्हणूनच या थरास आयनांबर असे म्हणतात. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे व अंतरिक्षातून येणाऱ्या अतिनील किरणांचे विकिरण होऊन वातावरणातील ऑक्सिजन व नायट्रोजन यांच्यामध्ये विद्युतभाराची क्रिया व प्रतिक्रिया होऊन यांची निर्मिती होते. रेडिओ लहरी परावर्तित करीत असल्यामुळे बिनतारी संदेश पाठविणे शक्य होते. आयनांबर थराची उंची भूपृष्ठापासून ८० ते ५०० किलोमीटर पर्यंत असून या थरात हवा विरळ असून रेडिओ लहरी, रॉकेट उडान या प्रयोगात या थराचा शोध लागलेला आहे.आयनांबराचे उपथर असून ८० ते ९६ किलोमीटर उंची दरम्यान डी थर असून या घरातून रेडिओच्या दीर्घ लहरी परावर्तित होतात. ९६ ते १४० किलोमीटर उंचीच्या दरम्यान असलेल्या आयनांबराच्या या धरास ई थर किंवा केनिली हेवीसाईड थर असेही म्हणतात. आयनांबराच्या तिसऱ्या उपथरास अपलटन थर किंवा एफ थर असेही म्हणतात.बह्यांबर :
पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ५०० ते ७५० किलोमीटर व त्यापलीकडील वातावरणाच्या थरास बहिमंडल असे म्हणतात. इ.स. १९४९ मध्ये लेमन स्पीटझर यांनी या थरास बहिर्मडल असे नाव दिलेले आहे. वातावरणाच्या या थरात ऑक्सीजन, हायड्रोजन व हेलियम या वायूंचे सूक्ष्म कण मुक्तपणे वावरताना आढळतात. या थरात अणूंची हालचाल ऊर्ध्वगामी दिशेने होते. इलेक्ट्रॉन व प्रोटॉन यांचे अस्तित्व ऋण विद्युतभारित व धन विद्युत भारित असतात, म्हणून या थरास चुंबकीय मंडल असे म्हणतात.
No comments:
Post a Comment