लोकसंख्या संक्रमण सिद्धांत
लोकसंख्यावाढविषयक सिद्धान्तात हा एक महत्त्वाचा सिद्धान्त आहे. लोकसंख्या संक्रमण ही संकल्पना सर्वप्रथम फ्रँक डब्ल्यू, नॉटस्टाईन यांनी मांडली. "लोकसंख्या बदलाचे चक्र सुरू असते त्यास लोकसंख्या संक्रमण असे म्हटले जाते सिद्धान्ताचे मूळ विवेचन डब्ल्यू. एस. थॉमसन आणि फ्रँक डब्ल्यू. नॉटेस्टाईन यांनी 1929 मध्ये केले. युरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियातील जननदर व मृत्युदर प्रवृत्तीच्या आधारे हा सिद्धान्त मांडला.एखाद्या शेतीप्रधान व निरक्षर समाजाचे जेव्हा शहरी, औद्योगिक, साक्षर आणि आधुनिक समाजामध्ये रूपांतर होते तेव्हा उच्च जनन व मृत्युदरापासून ते कमी होत जाणारा जनन व मृत्युदरापर्यंत लोकसंख्याविषयक बदल कसकसे घडून येतात त्याची एक विशिष्ट रचना या सिद्धान्तात मांडली गेली आहे.
गृहीतके
- जननदरात घट होण्याअगोदर मृत्युदरात घट होते.
- कालांतराने जन्मदर मृत्युदराइतका कमी होतो.
- लोकसंख्याविषयक बदल होत असतानाच समाजात आर्थिक व सामाजिक बदलही होत असतात.
- लोकसंख्यावाढीच्या अवस्था सुरुवातीला मंद, नंतर जलद व स्फोटक नंतर पुन्हा मंद वाढ व शेवटी स्थिर वाढ होत असते.
सिद्धान्त
लोकसंख्यावाढ ही जन्मदर व मृत्युदरावर अवलंबून असते. लोकसंख्यावाढ स्थिर होणे,जास्त होणे किंवा कमी होणे हे जन्मदर व मृत्युदराच्या बदलावर अवलंबून असते. लोकसंख्या संक्रमणाच्या तीन अवस्था केल्या जातात.
प्रथम अवस्था किंवा संक्रमणपूर्व अवस्था
द्वितीय अवस्था किंवा संक्रमणावस्था
तृतीय अवस्था किंवा संक्रमणोत्तर अवस्था
प्रथम अवस्था किंवा संक्रमणपूर्व अवस्था:
लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या अवस्थेत जन्म व मृत्युदर या दोन्हीचेही प्रमाण जास्तअसते. यामुळे या अवस्थेत लोकसंख्यावाढीचा वेग कमी असतो.
वैशिष्ट्ये:
- जन्म व मृत्युदर दोन्हीही 35 पेक्षा जास्त असतो.
- उत्पादन पद्धती अकार्यक्षम असते.
- ही अवस्था सामान्यपणे कृषीप्रधान देशात आढळते
- या अवस्थेतील देशात लोकसंख्येची घनता कमी असते.
- या अवस्थेत विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती कमी असते.
- निकृष्ट आहार, वैद्यकीय सुविधांचा अभाव, स्वच्छतेचा अभाव या कारणांमुळे मृत्युदराचे प्रमाण जास्त असते. तसेच दुष्काळ, पूर व इतर नैसर्गिक आपर्तीमुळे मृत्युदराचे प्रमाण वाढते.
- बालविवाह, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, दैववादी, मुलगा वंशाचा दिवा, दारिद्र्य, निरक्षरता इत्यादी कारणांमुळे या अवस्थेत जन्मदर जास्त असतो.
- या अवस्थेत आफ्रिकेतील केनिया, झांबिया, इथिओपिया, युगांडा, टांझानिया इत्यादीदेशांचा समावेश होतो.
द्वितीय अवस्था किंवा संक्रमणावस्थाा:
लोकसंख्या संक्रमणाच्या अवस्थेत आर्थिक विकासाला सुरुवात झालेली असते, मृत्युदराचे प्रमाण कमी झालेले असते, परंतु त्यामानाने जन्मदर मात्र फारसा कमी झालेला नसतो. त्यामुळे लोकसंख्येत वाढ होते.
वैशिष्ट्ये:
- 30 पेक्षा जास्त असणारा व हळूहळू कमी होत जाणारा जननदरआणि 15 दरापर्यंत जलद वेगाने घसरणारा मृत्युदर आढळतो.
.
- आरोग्यविषयक व औषधोपचार सोईमुळे मृत्युदर झपाट्याने कमी होत जातो. लोकांचे आयुर्मानही वाढत जाते
- औद्योगिकीकरण, नागरिकीकरण व आधुनिकीकरण या प्रक्रिया स्पष्ट होत जातात.
- विभक्त कुटुंब पद्धतीकडे लोकांचा ओढा असतो.
- राहणीमानाचा दर्जा उंचावतो व दरडोई उत्पन्नही वाढू लागते.
- या अवस्थेत लोकसंख्येचा विस्फोट झाल्याने या लोकसंख्येचा साधनसंपत्तीवर ताण पडतो.
- विज्ञान तंत्रज्ञानामध्ये प्रगती व साक्षरतेचा दर वाढतो,
- जगातील विकसनशील देशांचा समावेश होतो. यामध्ये भारत, पाकिस्तान,श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया, व्हिएतनाम, चीन, इजिप्त, ब्राझील, इराण, कोलंबिया,कोरिया, व्हेनेझुएला, पेरू, चिली, अर्जेंटिना इत्यादी देशांचा समावेश होतो.
तृतीय अवस्था किंवा संक्रमणोत्तर अवस्था :
लोकसंख्या संक्रमणाची ही तिसरी व शेवटची अवस्था होय. या अवस्थेत पहिल्या अवस्थेप्रमाणेच जन्म व मृत्युदर दोन्हीमध्ये घट होऊन समान पातळीवर येऊ लागतात.. त्यामुळे लोकसंख्या खूपच कमी किंवा स्थिर असते.
वैशिष्ट्ये:
- या अवस्थेत औद्योगिकीकरण व नागरिकीकरणाचा विकास झाल्यामुळे उच्चशिक्षण पातळी व साक्षरतेचे प्रमाण उच्च दर्जाचे असते.
- लोकांचा राहणीमानाचा दर्जा उच्च असतो.
- लोकांचे दरडोई उत्पन्न जास्त असते
- लोकांचे दरडोई उत्पन्न जास्त असते
- जाणीवपूर्वक कुटुंबनियोजन करून लोकसंख्या नियंत्रणात आणली जाते.
- श्रमाचे विशेषीकरण मोठ्या प्रमाणात होत जाते.
- देशाची अर्थव्यवस्था ही उद्योगप्रधान असते.
- अवस्थेत विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती अतिउच्च दर्जाची असते.या अवस्थेत औद्योगिकदृष्ट्या विकसित देशांचा समावेश होतो. यामध्ये जपान, ग्रेट ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, फिनलँड, स्वीडन, इटली, हंगेरी, संयुक्त संस्थाने, कॅनडा, रशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर, हाँगकाँग इत्यादी देशांचा समावेश होतो.
गुण / फायदे:
- लोकसंख्येची वाढ व घट लक्षात येते.
- लोकसंख्येची सामाजिक व आर्थिक प्रगती समजते.
- सिद्धान्त लोकसंख्येचे धोरण निश्चित करताना उपयुक्त ठरतो.
- लोकसंख्यावाढ व आर्थिक विकास यांच्यातील सहसंबंध स्पष्ट होतो.
दोष /तोटे:
- या सिद्धान्तात लोकसंख्या संक्रमणासाठी वेळेचा व काळाचा उल्लेख केलागेलेला नाही.
- जन्म व मृत्युदर किती कमी होईल किंवा लोकसंख्यावाढ नेमकी किती कमी होईल यांचे संख्यात्मक विश्लेषण केले गेले नाही.
- सर्वसामान्य निष्कर्ष काढण्यासाठी हा सिद्धान्त उपयोगाचा नाही.
- लोकसंख्या संक्रमण होण्यास आर्थिक विकास आवश्यक आहे किंवा नाही है। निश्चित सांगता येत नाही.
- केवळ आर्थिक विकासाबरोबरच मृत्युदर खाली येणे अशक्य आहे.
- या सिद्धान्तावरून लोकसंख्येबाबत भविष्यकालीन अंदाज करता येत नाही.
दोष /तोटे:
No comments:
Post a Comment