वातावरणाचे घटक
हवामानशास्त्र : व्याख्या
‘हवामानशास्त्र ज्याला इंग्रजीमध्ये (Climatology) नावाने संबोधले जाते. या इंग्रजी शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषेतील क्लाईमा (Clima) या शब्दापासून झालेली आहे.
व्याख्या
पृथ्वीवरील विविध हवामानाचा नैसर्गिक पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करणारे विज्ञान म्हणजेच हवामानशास्त्र होय.-डब्ल्यू.जी.मूर
हवामानशास्त्र हे पृथ्वीवरील विविध हवामानाच्या अभ्यासाचे शास्त्र आहे.- होव्हीर्ज व ऑस्टीन
ह्वामानाशास्त्रात जगातील वेगवेगळ्या प्रदेशातील हवामान व त्यांचा मानवावर व त्याच्या व्यवसायावर होणारा परिणाम अभ्यासला जातो.
पृथ्वीवरील निरनिराळ्या प्रकारचे हवामान व त्याचा नैसर्गिक पर्यावरणावर होणारा परिणाम यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला हवामानशास्त्र असे म्हणतात.
वातावरण
पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात.
पृथ्वीभोवतीअसलेल्या रंगहीन, गंधहीन व स्वादहीन थरास वातावरण असे म्हणतात.
वातावरण हे अनेक घटकांचे मिश्रण आहे. वातावरण हे प्रामुख्याने पुढील प्रमुख घटकांनी बनलेले आढळते.
वायु
पाण्याची वाफ / बाष्प
धुलीकण
वायु (Gases):
वातावरण हे निरनिराळ्या वायुच्या मिश्रणांनी बनलेले आहे. नायट्रोजन, ऑक्सिजन, ऑरगॉन, कार्बनडाय ऑक्साईड व इतर वायु आढळतात.
वनायट्रोजन (N2):
नायट्रोजन वायू वजनाने जड असल्याने वातावरणाच्या खालच्या थरात आढळतो. वातावरणात या वायूचे प्रमाण सर्वात अधिक ७८.०८% आढळते. सेंद्रिय पदार्थाचे ज्वलन व कुजने, भूगर्भातील तप्त लाव्हारसाचा उद्रेक इ. क्रियांद्वारे नायट्रोजन वायूचा पुरवठा वातावरणाला होत असतो. वनस्पतीची वाढ आणि संवर्धनासाठी नायट्रोजन वायूची आवश्यकता असते. नायट्रोजन वायू निष्क्रिय आहे. झाडांच्या पेशी मजबूत करण्यासाठी नायट्रोजन वायूची गरज असते.
ऑक्सिजन(O2):
वातावरणात प्रमाण २०.९४% इतके आहे. सजीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी ऑक्सिजन खूपच महत्त्वाचा वायू आहे म्हणूनच त्यास "प्राणवायू” असेही म्हणतात. जमीनीपासून जसजसे वातावरणाच्या वरच्या थरात जावे तसतसे ऑक्सिजन वायूचे प्रमाण कमीकमी होत जाते. म्हणूनच अतिउंचीवर किंवा उंच शिखरावर जाताना गिर्यारोहकांना, वैमानिकांना कृत्रिम ऑक्सिजन वायूचे सिलेंडर बरोबर घेऊन जावे लागते. ज्वलन क्रियेसाठी ऑक्सिजन उपयोगी ठरतो.
कार्बन डाय ऑक्साईड (CO2):
वातावरणात कार्बनचे प्रमाण अस्थिर असते. वातावरणातील प्रमाण ०.०३% आहे. प्राण्यांचे श्वसन, ज्वालामुखी क्रिया, वनस्पतींचे विघटन इ. मुळे कार्बनच्या प्रमाणात वाढ होते. हा वायू वनस्पतींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. वायूचे मोठ्या प्रमाणात शोषण होत असले तरी त्याचे वातावरणातील प्रमाण कमी होत नाही कारण दिवसा वनस्पती कार्बन डाय ऑक्साईड शोषतात व रात्रीच्या वेळी उच्छवासाद्वारे कार्बन बाहेर सोडतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा वायू सूर्यकिरणांबरोबर आलेले अतिनिल किरण शोषतात. जमीनीलगतच्या थराचे तापमान संतुलित रहाते, मात्र औद्योगिकरण वाढल्याने व स्वयंचलीत वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत चालले आहे.
ओझोन वायु (O3):
जमिनीलगत या वायूचे प्रमाण कमी आढळते हा वातावरणातील एक महत्त्वाचा वायु .हा वायू भृपृष्ठापासून १५ ते ३५ कि.मी. उंची वरील वातावरणाच्या थरात पसरलेला आहे. वातावरणात ओझोन वायूचे प्रमाण ०.००००६% इतके अत्यल्प आहे. याला पृथ्वीची 'संरक्षक छत्री' असेही म्हटले जाते कारण ओझोन वायूच्या थरात सुर्यप्रकाशातील अतिनिल (Ultraviolate) किरणे शोषली जातात.
इतर वायू :
ऑरगॉन, निऑन, क्रेप्टॉन, झेनॉन वायूही वातावरणात आढळतात.
पाण्याची वाफ / बाष्प :
वातावरणात पाण्याची वाफ किंवा बाष्प वायूरूप अवस्थेत आढळते. वाळवंटी प्रदेशातही बाष्पाचे अल्प प्रमाण आढळते. सौरउर्जुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन ती वाफ वातावरणात येऊन मिसळते. हवेतील बाष्पकणांपासून पाऊस, धुके, दव आणि हिम यांची निर्मिती होते. वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणानुसार हवा कोरडी किंवा दमट आहे हे ठरविले जाते. बाष्प मुळे वातावरणात विविध अविष्कार निर्माण होतात. जास्त तापमान असलेल्या प्रदेशात बाष्यांचे प्रमाण जास्त असते. उंचीनुसार तापमान कमी होत गेल्याने हवेची बाष्प धारणाशक्ती कमी होत जाते. हवा बाष्प संपृक्त होऊन मेघामुळे वृष्टी होते.बाष्पामुळे मानवी त्वचा मऊ व मुलायम राहते.
धूलिकण :
वातावरणाच्या खालच्या थरात धूलिकण आढळतात. वातावरणातील वायू व बाष्प सोडून इतर जे घनरूप घटक वातावरणात मिसळलेले आढळतात, त्यांना धूलिकण असे म्हणतात. धूलिकणांचे प्रमाण सर्वत्र सारखे नसते याशिवाय त्यांचा आकारही भिन्न-भिन्न असतो. धूलिकणांची निर्मिती नैसर्गिक व मानवी घटकांद्वारे होते. यात मातीचे कण, धुराचे कण, तंतू, जीवजंतू व पालापाचोळ्याचे कण अशा कणांचा समावेश होतो. वजनाने जड असणारे धूलिकण वातावरणाच्या खालच्या थरात तर हलके धूलिकण वातावरणाच्या वरच्या थरात असतात. धूलिकण सूर्याकडून येणारी सौरशक्ती वातावरणात शोषून घेतात. याशिवाय सौरशक्तीचे विकिरण व परावर्तन धूलिकणाद्वारे होत असते. वातावरणात असणाऱ्या याच धूलिकणांमुळे आपणास सूर्योदय व सूर्यास्त होण्यापूर्वी संधिप्रकाश दिसून येतो.
No comments:
Post a Comment